शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पहिल्यांदा धूरकरी झालेली २३ वर्षांची उन्नती म्हणते, ‘डर के आगे जित है’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:58 IST

उन्नतीच्या पाठीवर कौतुकाची थाप

मनीष तसरे

अमरावती : २३ वर्षांची पोर ती. गावातच शंकरपट पाहत मोठी झालेली; पण हातात कधी बैलाचे कासेही धरले नव्हते. पण, गावाच्या इभ्रतीसाठी, वडिलांच्या शब्दाखातर तिने महिलांच्या शंकरपटात नाव दिले. पहिल्यांदा ती धूरकरी झाली आणि तब्बल आठ वर्षांनंतरचा पहिला पट आपल्या नावे केला. कारण तिला माहीत होते, डर के आगे जित है. १२५ वर्षांची परंपरा लाभलेल्या तळेगाव दशासर येथील कृषक सुधार समितीच्या वतीने आयोजित शंकरपटाच्या चौथ्या दिवशीचा तो थरार हजारो गावकऱ्यांनी नुसता बघितलाच नाही तर उन्नतीच्या पाठीवर कौतुकाची थापदेखील दिली.

होय, उन्नती लोया या धाडसी तरुणीचे नाव आहे. तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक शंकरपटाने तिला नाव मिळवून दिले. या गावात काेरोनापश्चात ऐतिहासिक शंकरपटाचे वेध लागले. पण, आठ वर्षांच्या कालवधीने होत असलेल्या या शंकरपटात महिला धूरकरी येतील किंवा नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे आयोजकांपैकी एक असलेल्या वडिलांनी मुलगी उन्नतीलाच सहभाग घेण्यास सांगितले. घरी शेतीची पार्श्वभूमी असली तरी तिने आतापर्यंत बैलांचे कासरेही धरले नव्हते.

उन्नतीने वडिलांना होकार दिला, मात्र तिच्या मनात धाकधूक होती. बैलांनी आपल्याला पाडले तर.. बैल वेगळीकडेच धावले तर... मात्र वडिलांनी सांगितले, तू करू शकतेस. संग्राम-देवगिरी ही बैलजोडी पटासाठी देणाऱ्या जोडीमालकानेही धीर दिला. लागलीच ती धूरकरी व्हायला तयार झाली. तिनेही मनाशी प्रण केला, मी करू शकते. ‘डर के आगे जित है’ ही खूणगाठ तिने मनाशी बांधली आणि बघता बघता धूरकरी झाली.

बहिरम यात्रेत आजपासून शंकरपट; चेंडू-सैराट दाखल, हार्दिक कृणाल पांड्या येणार

या शंकरपटात उन्नतीसह १५ महिला धूरकरी सहभागी झाल्या. यात ४५० फुटांचे अंतर उन्नती हाकत असलेल्या बैलजोडीने १३.७२ सेकंदात पार करून प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, वडिलांच्या आग्रहाखातर सहभागी झालेली उन्नती ही उच्चविद्याविभूषित असून, नागपूरला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करीत आहे. तिच्याबाबत माहिती असणाऱ्या ग्रामस्थांनी बक्षीस वितरणाला टाळ्यांचा जो प्रचंड कडकडाट केला, तो तिच्या या धाडसाला होता. जिंकलेले बक्षीस हे तिने बैलजोडी मालकाला दिले.

मिळालेल्या संधीचे सोने

पहिल्यांदाच शंकरपटात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे मी सोने केले, त्यामुळे आता शंकरपटाबाबतची आवड आपसुकच निर्माण झाली आहे. युपीएससीची तयारी करीत असताना दरवर्षी पटात सहभागी होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उन्नतीने सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकBull Cart Raceबैलगाडी शर्यतAmravatiअमरावती