अमरावतीमध्ये २३ अहवाल पॉझिटिव्ह; एकाच परिवारातील सहा सदस्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:14 IST2020-07-01T20:14:41+5:302020-07-01T20:14:50+5:30

अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५९२ झालेली आहे.

23 reports positive in Amravati; Consisting of six members of the same family | अमरावतीमध्ये २३ अहवाल पॉझिटिव्ह; एकाच परिवारातील सहा सदस्यांचा समावेश

अमरावतीमध्ये २३ अहवाल पॉझिटिव्ह; एकाच परिवारातील सहा सदस्यांचा समावेश


अमरावती : जिल्ह्यात बुधवारी २३ संक्रमितांची नोंद करण्यात आली. यामध्ये एकाच परिवारातील एका वर्षाच्या बालकासह सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५९२ झालेली आहे.

नागपूर येथील एका खासगी लॅबद्वारा प्राप्त अहवालात सोनल कॉलनीतील २८ व ५५ वर्षीय महिला व दर्यापूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या व्यतिरिक्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लॅबद्वारा प्राप्त अहवालात कृष्णानगरातील १ वर्षाच्या बालकासह २४ महिला, २७, ३२ पुरुष तसेच ५३ व ६४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विदर्भ प्रीमियर सोसायटीत ३५ वर्षीय महिला, राजापेठ येथे ५३ वर्षीय पुरुष, बडनेरा जुनी वस्तीत ३६ वर्षीय पुरुष जिल्हा ग्रामीणमध्ये दर्यापूर येथे ४८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

सायंकाळच्या अहवालात बडनेरा जुनीवस्तीत ६५ वर्षीय, भीमनगरात ६० वर्षीय, श्रीकृष्ण पेठमध्ये २३ वर्षीय, रहाटगावात ५८ वर्षीय व अकोला येथील ५६ वर्षीय तसेच कॅम्प येथील ७२ वर्षीय पुरुष व अशोकनगरात ४० वर्षीय, अंजनगाव सुर्जी येथील मोमीनपुºयात ३२ वर्षीय, महात्मा फुले नगरात ४१ वर्षीय तसेच ओम कॉलनीत ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

Web Title: 23 reports positive in Amravati; Consisting of six members of the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.