नैसर्गिक आपत्तीत २३ व्यक्तींचा मृत्यू

By Admin | Updated: August 4, 2015 00:05 IST2015-08-04T00:05:35+5:302015-08-04T00:05:35+5:30

पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नसला तरी, अमरावती विभागात १ जून ते २४ जुलै पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे २३ व्यक्ती मृत्युमुखी पडले असून...

23 deaths in natural calamities | नैसर्गिक आपत्तीत २३ व्यक्तींचा मृत्यू

नैसर्गिक आपत्तीत २३ व्यक्तींचा मृत्यू

६६५ घरांची पडझड : १ जून ते २३ जुलैदरम्यान ६५ जनावरे ठार
सुरेश सवळे चांदूरबाजार
पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नसला तरी, अमरावती विभागात १ जून ते २४ जुलै पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे २३ व्यक्ती मृत्युमुखी पडले असून २८ मोठी, ३७ लहान तर १४ मध्यम स्वरुपाने जनावरेसुध्दा मृत्युमुखी पडल्याची माहिती शासकीय आकडेवारीनुसार प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रातील काही भाग वगळता संपूर्ण विदर्भात पाण्याची टक्केवारी समाधानकारक नसतानाही नैसर्गिक आपत्तीमुळे अमरावती विभागात २३ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहे. ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ६, अकोला जिल्ह्यात ३, यवतमाळ ५, बुलडाणा ६, वाशिम ३ असा समावेश आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यंमध्ये सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजे ६ इतकी असून एकूण मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीमध्ये वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक १५ इतकी दिसून येते.
विभागात २८ मोठी दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १९ इतकी आहे. तसेच लहान दुधाळ जनावरांची ३७ असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक २७ जनावरांचा समावेश आहे. अमरावती विभागात अवघड काम करणाऱ्या जनावरांची मृत्युंची संख्या १४ इतकी असून, बुलडाणा जिल्ह्यातीलच सर्वाधिक ६ जनावरे मृत्युमुखी पडल्याचे शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे अमरावती विभागात मृत्युमुखी पडलेल्या एकूण २३ व्यक्तीपैकी काहींना एकूण ८४ लाख रुपये इतकी मदत शासनाकडून देण्यात आली आहे. पूर्णत: पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या २ असून अंशत: पडझड झालेल्या कच्या घरांची संख्या मात्र ६६५ इतकी असल्यामुळे अमरावती विभागात पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी असतानासुध्दा नैसर्गिक आपत्ती मात्र सुरुच असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 23 deaths in natural calamities