शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

शासनाच्या फतव्याने व-हाडाला २०४ कोटींचा फटका, पीक कापणीअंती १४४ मंडळ निकषात बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 4:37 PM

शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे. यामध्ये विभागातील २५१ मंडळांत ६१२ कोटी ७७ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल २३ फेब्रुवारीला पाठविण्यात आला. यापूर्वी संयुक्त सर्वेक्षणानंतर विभागात ८१७ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल २३ जानेवारीला शासनाला पाठविण्यात आला होता. शासनाने महिनाभराच्या अंतरात दोन वेळा बाधित कपाशी क्षेत्राचा  अहवाल आवश्यक मदतनिधीच्या मागणीसह विभागीय आयुक्तांना मागतिला होता. मात्र, दुस-या अहवालात शब्द फिरवून मंडळनिहाय अहवाल मागितल्याने यवतमाळ वगळता उर्वरित चार जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय केवळ फार्स ठरणार आहे. शासनाचे ७ डिसेंबरचे आदेशान्वये विभागात बोंडअळीमुळे ३३ टक्क्क््यांवर बाधित क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ९,३८,११५ शेतकºयांचे १०,५१,७७१ हेक्टरमधील कपाशीचे ८१७ कोटी तीन लाख ७९ हजारांचे नुकसान झाल्याचा अहवाल २३ जानेवारीला पाठविण्यात आला. त्यानंतर १७ फेब्रुवारीचे आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्याची पीक कापणी प्रयोनंतरची स्थितीचा अहवाल शासनाने मागीतला यात विभागातील २५१ महसूल मंडळामध्ये ६,८४,७९२ शेतकºयांच्या  ८,१३,६१४ हेक्टरमधील  कपाशीचे ६१२ कोटी ७७ लाख ८६ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल २३ फेब्रुवारीला फाठविण्यात आता. शासनाचे शब्दच्छलामुळे २०४ कोटींचा फटका शेतकºयांना बसला आहे.

२३ जानेवारीच्या अहवालात वस्तुस्थितीविभागात बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचे ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो काढण्यात येऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल शासनाला २३ जानेवारीला पाठविण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १८२ कोटी ६० लाख, अकोला १३५ कोटी ५१ लाख, यवतमाळ ३४९ कोटी १७ लाख, बुलडाणा १३४ कोटी ३४ लाख व वाशिम जिल्ह्यात १५ कोटी ४० लाख असे एकूण ८१७ कोटी तीन लाखांच्या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली.

२३ फेब्रुवारीचा मंडळनिहाय अहवाल विभागात पीक कापणी प्रयोगानंतर कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसानामध्ये अमरावती जिल्ह्याच्या ४६ मंडळात १०३ कोटी ६४ लाख, अकोला जिल्ह्यात १८ मंडळात ५१ कोटी ६९ लाख, बुलडाणा जिल्ह्यात ६२ मंडळांत १०३ कोटी दोन लाख, वाशिम जिल्ह्यात २४ मंडळात पाच कोटी २४ लाखांचे नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जैसे थै आहे.

टॅग्स :cottonकापूसAmravatiअमरावती