शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

२० हजारांच्या लाचप्रकरणी औषधी सह आयुक्तांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 9:28 PM

मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी औषधी सह आयुक्तांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे.

अमरावती: मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी औषधी सह आयुक्तांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे.

तक्रारदाराचे मेडिकल स्टोअर असून औषधी सह आयुक्तांनी तक्रारदाराच्या मेडिकलमधून यापूर्वी घेतलेल्या नमुन्यांपैकी काही नमुन्यांच्या नकारात्मक तपासणी अहवालावरून तक्रारदाराविरुद्ध कुठलीही कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच व एका कंपनीचे दोन पावडरच्या डब्यांची लाचेची मागणी केली होती. यापूर्वी १८ हजारांची लाच स्वीकारली. उर्वरित दोन हजारांची लाच व एक पावडरचा डबा स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सह आयुक्ताला त्याच्या दालनात अटक करण्यात आली.

प्रभारी सहायक आयुक्त आणि औषधी निरीक्षक अन्न व औषधी प्रशासन विभाग अमरावती येथे कार्यरत चिंतामण कानुजी डांगे (४९) असे आरोपीचे नाव आहे. त्याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी अटक केली. ३७ वर्षीय औषधे व्यवसायिकांना आरोपीने २० हजार रुपये व दोन पावडरच्या डब्याची लाच मागणी केली होती. यापैकी १८ हजार रुपये व एक पावडरचा डबा लाच म्हणून आरोपीने यापूर्वीच स्वीकारली. याची पडताळणी एसीबीने केल्यानंतर सापळा कारवाई दरम्यान दोन हजार रुपये व २६० रुपये किमतीचा पावडरचा डबा आरोपीने स्वीकारताना एसीबीनेत्याला रंगेहात पकडले.

दरम्यान या कारवाईमुळे एफडीएमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच ही कारवाई खुद्द आरोपीच्या कार्यालयातील दालनात करण्यात आली असून यासंदर्भाचा गुन्हा कोतवाली ठाण्यात नोंदविण्यात आला. ही करवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, चंद्रशेखर दहेकर, सुनील वºहाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, चंद्रकांत जनबंधू आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयfraudधोकेबाजीArrestअटक