शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

अमरावती शहरात सहा महिन्यांत २० खून, हल्ल्यात २३ जण मरता-मरता वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:55 IST

Amravati : अलीकडे शहराचा खूपच विस्तार झाला आहे. त्यामुळे तपोवन व एमआयडीसी या भागात नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर आयुक्तालयात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण २० खून नोंदविले गेले, तर खुनाचा प्रयत्न या शीर्षकाखाली एकूण २३ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहा महिन्यात खुनाच्या गुन्ह्यात सहाने वाढ नोंदविली गेली. मात्र, त्याचवेळी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सातने घट नोंदविली गेली.

कोल्ड पत्नीचा ब्लडेड मर्डर करून तिचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला होता. २ जानेवारी रोजी भीमटेकडी रोडवरील भोवते ले आऊटमध्ये ती घटना उजेडात आली होती, तर १ फेब्रुवारी रोजी तपोवन परिसरातील संस्कृती नामक तरूणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी रहाटगाव येथील फार्म हाऊसमध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळून आला होता. त्यात तीन दिवसांनी मृत पतीविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ मार्च रोजी स्थानिक मसानगंज भागात आदर्श गुप्ता याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्येच हार्डकोअर क्रिमिनल गोंडीचा खून झाला होता.

वसंत चौकात फायर४ एप्रिल रोजी वसंत चौकातील एका पानमटेरियल दुकानावर देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. गुटख्याची तस्करी व वर्चस्ववादातून घडलेल्या त्या घटनेमुळे शहर हादरले.

रागाने बघितले तरीही चाकूवाहनाचा कट जरी लागला तरी तरूण गुन्हेगारांकडून चायना चाकू उगारला जातो. रागाने बघितले तरीही चाकू काढल्याचे उदाहरणे आहेत.

शहरात नशेखोरीला उतशहरात गेल्या काही वर्षांपासून नशेखोरीला उत आला आहे. शहरात अलीकडे एमडी ड्रग्सदेखील पकडण्यात आले. तर काही ठिकाणांहून गांजादेखील जप्त करण्यात आला.

सहा महिन्यात किती खून ?शहराचा तार झाला के तपोवन पडीसी या या पोलिस गरज आहे. शहरातील दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते जून या कालावधीत २० जणांचे खून करण्यात आले. तर २३ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

क्राईमची दमदार कारवाईबहुतांश खुनाच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात शहर गुन्हे शाखेची दोन्ही युनिट फ्रंटफूटवर राहिली. क्राईम युनिटनेच खुनाच्या अनेक आरोपींचा त्वरेने शोध लावला.

२३ जण मरता मरता वाचलेशहर आयुक्तालयात गेल्या सहा महिन्यात बीएनएसच्या कलम १०९ अन्वये २३ एफआयआर नोंदविले गेले. त्या २३ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ते मरता मरता वाचले.

सर्वात जास्त खून घडले खुन्नसमधून, वैमनस्यातूनयंदाच्या पहिल्या सहा महिन्यात २० जणांचे खून करण्यात आले. त्यात खुनाच्या सर्वाधिक घटना या आपसी वैर, वर्चस्ववाद व खुन्नस दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निरीक्षण आहे.

"शहराची व्याप्ती अलीकडे अधिकच वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवरदेखील अधिक ताण येतो. यंदाच्या सहा महिन्यात खुनाचे गुन्हे वाढले असले, तरी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोठी घट झाली आहे."- शिवाजीराव बचाटे, एसीपी, क्राईम 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती