नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 07:37 PM2020-10-12T19:37:06+5:302020-10-12T19:37:21+5:30

२,७८४ कुटुंबे बाधित

19 victims of natural calamities this year; Crop damage on 1.98 lakh hectares | नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

googlenewsNext

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १९ व्यक्ती नैसर्गिक आपत्तीच्या बळी ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त लहान-मोठी ५१ जनावरे दगावली. या आपत्तीमुळे २,७८४ कुटुंबे बाधित झाली, तर किमान १ लाख ९८ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ४२ हजार ८५० हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १० तालुक्यांनी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी पार केली. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मोठी  वित्तहानी व प्राणहानी झाली. या चार महिन्यांतील आपत्तीमध्ये जिल्ह्यात ५३० गावांमध्ये २,७८४ कुटुंबे बाधित झाली आहेत. १९ जण दगावले. यापैकी ११ जण पुरात वाहून गेले, तर आठ जणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सर्वच प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. 

चार महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने २३ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यापैकी १४ प्रकरणांत ४.२५ लाखांची मदत देण्यात आली. १७ लहान दुधाळ जनावरे मरण पावली. यापैकी चार प्रकरणांत ६४ हजारांची मदत देण्यात आली. याव्यितिरिक्त ओढकाम करणारी सात जनावरे दगावल्याचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये २६ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यासाठी १ लाख २७ हजार ६५० रुपयांची शासन मदत देण्यात आली. ९६ घरांची अंशत: पडझड झाली. १९०७ कच्च्या घरांची पडझड झाली. यासाठी १० लाख ७५ हजार ३९४ रुपयांची शासन मदत देण्यात आली. ५७७ घरे पूर्णत: नष्ट झाली. यासाठी २ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे.
 
 शेतीपिकांचे तालुकानिहाय नुकसान

आपत्तीमध्ये अमरावती तालुक्यात ३१,९४३ हेक्टर, भातकुली तालुक्यात १६१.२५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १०५८ हेक्टर, धामणगाव रेल्वे २८,०३४ हेक्टर, चांदूर रेल्वे २०,६७९ हेक्टर, मोर्शी १९,२७७ हेक्टर, वरूड २९,९७० हेक्टर, अचलपूर ११,०६० हेक्टर, चांदूर बाजार १६१८५ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १९,३२३ हेक्टर, धारणी ११,७२९ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ९३८८ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. तिवसा व दर्यापूर तालुक्यात नुकसान निरंक आहे.

Web Title: 19 victims of natural calamities this year; Crop damage on 1.98 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.