SSC Exam : अमरावती विभागात दहावीचे १.८८ लाख विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 20:19 IST2020-03-02T20:18:11+5:302020-03-02T20:19:28+5:30
10 th Exam : अमरावती जिल्ह्यात ४५ हजार ९३८ विद्यार्थी मंगळवारपासून दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यांची आसनव्यवस्था विविध शाळांच्या परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे.

(छाया - मनीष तसरे, अमरावती)
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्यापरीक्षांना ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यात अमरावती विभागातून १ लाख ८८ हजार ६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ७१३ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून, १ लाख ४ हजार ९२ मुले, तर ८३ हजार ९७२ मुलींचा समावेश आहे. विभागासाठी ७३ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात ३० हजार ७८५, अमरावती ४५ हजार ९३८, बुलडाणा ४३ हजार ९२२, यवतमाळ ४४ हजार ३०५ आणि वाशिम जिल्ह्यात २३ हजार ११४ परीक्षार्थीदहावीची परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हानिहाय सहा भरारी पथके आहेत तसेच जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता पथकाची नेमणूक केली आहे. विभागात आठ केंद्रांना उपद्रवी केंद्रे घोषित करण्यात आले आहे. २३ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा चालणार आहे.