शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अमरावती विभाग ‘पदवीधर’साठी १.८६ लाख मतदार; अंतिम यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 18:34 IST

graduate constituency amravati : सन २०१७ च्या तुलनेत २४,१५१ ने कमी : जनजागृतीही ठरली प्रभावहीन

अमरावती : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली. यामध्ये १,८६ ३६० मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत ६०,४३६ ने वाढ, तर सन २०१७च्या तुलनेत सद्यस्थितीत २४,१५१ ने मतदार संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील आमदारांचा कालावधी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी समाप्त होत आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झालेली आहे. ती २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी संपेपर्यंत सुरू राहणार आहे.

पदवीधर मतदारसंघात दर सहा वर्षांत किमान १० टक्के मतदार संख्या वाढ गृहित धरण्यात येते. यामध्ये काही मतदार मृतदेखील होतात. त्यानुसार यावेळेस किमान २.३५ ते २.४० लाखांचे दरम्यान मतदार संख्या राहील, अशी निवडणूक विभागाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती संख्यादेखील पार झालेली नसल्याने यावेळी पदवीधरांमध्ये असलेला अनुत्साह चर्चिला जात आहे. या मतदार संघासाठी प्रत्येकवेळी नव्याने मतदार यादी तयार केली जाते. त्यानुसार निवडणूक विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती केली होती.

जिल्हानिहाय तुलनात्मक मतदार संख्या

जिल्हा : २०१७ - २०२२

  • अमरावती : ७६,६७१ - ५७,०६४
  • अकोला : ४७,१८६ - ४४,५०६
  • यवतमाळ : ३२,९९९ - ३३,२४९
  • बुलढाणा : ३४,९१९ - ३६,४९७
  • वाशिम : १८,५३६ - १५,०४४

एकूण : २,१०,५११ - १,८६,३६०

टॅग्स :ElectionनिवडणूकTeacherशिक्षकAmravatiअमरावतीAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमYavatmalयवतमाळ