ड्रायव्हिंग लायसन्सवर १८ टक्के जीएसटी
By Admin | Updated: July 3, 2017 00:26 IST2017-07-03T00:26:39+5:302017-07-03T00:26:39+5:30
शिकावू आणि पक्क्या परवान्यासाठी वाहन चालकाला तब्बल १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सवर १८ टक्के जीएसटी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिकावू आणि पक्क्या परवान्यासाठी वाहन चालकाला तब्बल १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. १ जुलैपासून संपूर्ण देशात जीएसटी ही कर प्रणाली कार्यान्वित झाली. या पार्श्वभूमिवर गृह (परिवहन) विभागाने ‘लर्निंग आणि पर्मनंट’ परवान्यासाठी जीएसटीचे दर लागू केले आहे.
जीएसटी लागू करण्यात आला. त्यामुळे सेवाकर रद्द होवून जीएसटी लागू झाला. त्यानुसार परिवहन विभागांतर्गंत जारी होणाऱ्या शिकावू व पक्क्या परवान्याबाबत सुधारित सेवा शुल्क वसूल करण्यास मान्यता दिली आहे. जीएसटी लागू झाल्याने शिकावू परवान्यासाठी संबंधित अर्जदारास २०१ रुपये तर पक्क्या परवान्यासाठी ७६६ रूपये अर्जासोबत भरावयाचे आहेत. २०१ रुपयांपैकी १९४.६३ रूपये तर ७६६ रुपयांपैकी ६६२.९९ रूपये शासनाकडे जमा होणार आहे.