शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राज्यातील १,७३४ जिल्हा परिषद शाळांना लागणार कायमचे टाळे ! 'गाव तेथे शाळा' धोरणाला पूर्णविराम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:27 IST

Amravati : १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांत होणार रूपांतर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाकडून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना १ ते ५ पटसंख्या व एकाच परिसरातील जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील १,७३४ शाळांना कायमचे टाळे लागणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांवर प्राथमिक शिक्षणासाठी पायपीट करण्याची नामुष्की ओढवणार आहे. शाळा बंद होणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांचे इतरत्र समायोजन होणार असल्याने शिक्षकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २००९ साली अमलात आणून 'गाव तेथे शाळा' हे धोरण राबवले. 

गाव, वाडी, वस्ती, तांडा येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. मात्र राज्यात १ ते ५ पटसंख्येच्या १,७३४, ६ ते १० पटसंख्या असलेल्या ३,१३७ तर १० ते २० पटसंख्या असलेल्या ९,९१२ शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थी संख्या कमी असल्याने शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. २० पटसंख्यापर्यंतच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्याना लगतच्या शाळेत प्रवेशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाला विरोध झाल्याने मागील तीन वर्षापासून शाळा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

'यू-डायस' क्रमांकही रद्द होणार

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर केल्या जाणार आहे. शाळा बंद केल्यामुळे समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दरमहा ६०० रुपये दिले जाणार आहेत. यामुळे बंद शाळांचा 'यू-डायस' क्रमांकही रद्द होईल.

"आरटीई कायद्यानुसार एक किलोमीटरच्या आतमध्ये प्राथमिक शाळा व तीन किलोमीटरच्या आतमध्ये माध्यमिक शाळा म्हणजे प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण हे स्वगावातच मिळाले पाहिजे. गोरगरीब, शेतकरी तसेच मुलींना वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव आहे. वाहन भत्ता ही एक पोकळ घोषणा आहे."- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक समिती

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: 1,734 Zilla Parishad Schools Face Closure; 'School in Every Village' Ends?

Web Summary : Maharashtra plans to consolidate low-enrollment Zilla Parishad schools, potentially closing 1,734. This move raises concerns about students' access to primary education and teacher relocation, impacting the 'school in every village' initiative despite promised transport allowances.
टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणRight To Educationशिक्षण हक्क कायदा