मोर्शी तालुक्यात १७१ कुटुंबांना पुराचा फटका
By Admin | Updated: July 28, 2014 23:16 IST2014-07-28T23:16:19+5:302014-07-28T23:16:19+5:30
चारघड नदीच्या पूरामुळे चार गावातील १७१ कुटुंब प्रभावित झाले असून १३७५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे आणि शेत जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाने व्यक्त केला आहे.

मोर्शी तालुक्यात १७१ कुटुंबांना पुराचा फटका
मोर्शी : चारघड नदीच्या पूरामुळे चार गावातील १७१ कुटुंब प्रभावित झाले असून १३७५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे आणि शेत जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाने व्यक्त केला आहे.
चारघडच्या पूरामुळे उदखेड, खोपडा, खेड आणि लाडकी गावांमध्ये मोठी हानी झाली. या गावातील नदी काठची घरे पाण्यात बुडाली, शेत जमिनी खरडून गेल्या. खोपडा येथील २, खेड येथील१ आणि लाडकी येथील २ अशी ५ घरे जमिनदोस्त झाली.
खेड येथील ७६ कुटुंब, खोपडा येथील ४० आणि लाडकी येथील ४० तर उदखेड येथील १५ कुटुंब असे एकूण १७१ कुटुंबांसह या कुटुंबातील ६३३ व्यक्ती प्रभावित झाल्या. सर्वाधिक खोपडा, खेड येथील प्रत्येकी ३०, लाडकी येथील २४ आणि उदखेड येथील १८ घरे अंशत: प्रभावित झाली. खेड येथील ६५० हेक्टर, लाडकी आणि उदखेड येथील प्रत्येकी २५० हेक्टर आणि खोपडा येथील २२५ हेक्टरसह एकूण १३७५ हेक्टर शेती बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.