महापालिकेतील १,६५३ फेरीवाल्यांना ‘स्मार्ट कार्ड’

By Admin | Updated: July 8, 2016 00:07 IST2016-07-08T00:07:36+5:302016-07-08T00:07:36+5:30

महापालिका क्षेत्रातील हॉकर्स झोनमध्ये हक्काच्या जागेवर व्यवसाय करु इच्छिणाऱ्या १६५३ नोंदणीकृत फेरीवाल्यांना पालिकेकडून ‘स्मार्टकार्ड’ वितरित केले जाणार आहेत.

1,653 hawkers in municipal corporation 'smart card' | महापालिकेतील १,६५३ फेरीवाल्यांना ‘स्मार्ट कार्ड’

महापालिकेतील १,६५३ फेरीवाल्यांना ‘स्मार्ट कार्ड’

हॉकर्स झोन निश्चित : ‘स्मार्ट प्रक्रियेला वेग’, ११ हॉकर्स झोनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
प्रदीप भाकरे अमरावती
महापालिका क्षेत्रातील हॉकर्स झोनमध्ये हक्काच्या जागेवर व्यवसाय करु इच्छिणाऱ्या १६५३ नोंदणीकृत फेरीवाल्यांना पालिकेकडून ‘स्मार्टकार्ड’ वितरित केले जाणार आहेत. बायोमेट्रिक सर्व्हेक्षणानंतर फेरीवाला म्हणून पात्र ठरणाऱ्या या १६५३ व्यक्तींसाठी हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित २४६८ फेरीवाल्यांना महापालिका क्षेत्रात व्यवसायबंदी राहील.
शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी हॉकर्स झोन अत्यंत आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात सीमॅक आयटी प्रा.लि. या एजन्सीद्वारे फेरीवाल्यांचे बायोमॅट्रीक सर्व्हेक्षण करण्यात आले. या दरम्यान शहरातील ४१२१ फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर कोण, कुठे, किती वर्षापासून व्यवसाय करतो आहे, यासह अन्य जुजबी माहितीसाठी फेरीवाल्यांकडून झोन दाखल्यासह अन्य काही कागदपत्रे मागविण्यात आली. तथापि ४१२१ पैकी १६५३ फेरीवाल्यांनीच आवश्यक ती कागदपत्रे मुदतीत जमा केल्याने ते अधिकृत ठरले व त्यांच्यासाठीच जागा निश्चितीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. २००४ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी १७ हॉकर्स झोन निश्चित केले. त्यापैकी ११ ठिकाणी आता ‘हॉकर्स झोन’ निश्चित होऊ शकतात. या ११ ठिकाणी सुमारे ४९५ फेरीवाल्यांना जागा उपलब्ध होवू शकते. त्यादृष्टीने एडीटीपीकडून अहवाल आल्यानंतर शहर फेरीवाला समितीमध्ये मंजुरी घेण्यात येईल व तेथे १६५३ फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्रामध्ये बसविण्याची कारवाई केली जाईल. या १६५३ अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेद्वारे स्मार्टकार्ड देण्यात येतील. शहरात १७ हॉकर्स झोन, १६ नो हॉकर्स झोन व सुटीच्या दिवशीकरिता १० हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत.

एडीटीपीकडे जबाबदारी
४१२१ पैकी १६५३ फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनाची अर्धिअधिक जबाबदारी एडीटीपीकडे आहे. फेरीवाल्यांच्या मार्गनिहाय संख्येनुसार यापूर्वी निश्चित केलेल्या फेरीवाला सेवामध्ये प्रत्येक फेरीवाला क्षेत्रामध्ये फेरीवाल्याला किती जागा देता येईल? तसेच त्यानुसार प्रत्येक फेरीवाला क्षेत्रामध्ये एकूण किती फेरीवाले बसण्याकरिता जागा उ्लब्ध आहे? याचे मोजमाप करुन देणे, तसेच संपूर्ण फेरीवाला क्षेत्राचे नकाशे तयार करुन, पिवळे पट्टे मारुन हॉकसर झोन आणि नो हॉकर्स झोनची जागा आखली जाईल. त्यासाठी फेरीवाल्यांची संपूर्ण माहिती सहायक नगररचना विभागाकडे पाठविली जाईल.

२४६८ फेरीवाले अनधिकृत
वारंवार मुदतवाढ देऊनही झोन दाखल्यासह अन्य कगदपत्रे न देणाऱ्या २४६८ फेरीवाल्यांवर ‘अनधिकृत’चा शिक्का बसणार आहे. १६५३ फेरीवाल्यांना ‘स्मार्टकार्ड’ दिल्यानंतर उर्वरित फेरीवाल्यांना शहर क्षेत्रात व्यवसायबंदी राहील. २० मेपर्यंत सर्व फेरीवाल्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

आयुक्त सकारात्मक
आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर लगेचच हेमंत पवार यांनी हॉकर्स झोनची फाईल मागवून त्यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला. आयुक्तांच्या सकारात्मक पुढाकाराने १६५३ फेरीवाल्यांना निश्चित असे स्थान मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. पवार यांनी हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोनची पाहणी सुद्धा केली.

अतिक्रमणावर प्रभावी मात्रा
सध्या संपूर्ण शहरात फेरीवाल्यांचेच अतिक्रमण अधिक आहे. किमान १६५३ फेरीवाले निश्चित अशा हॉकर्स झोनमध्ये जाऊन व्यवसाय करतील. तेव्हा आपोआपच अतिक्रमणाचा मुद्दा निकाली निघायला सुरुवात होईल. अतिक्रणमुक्त शहरासाठी हॉकर्‘ झोन व तो हॉकर्स झोन अत्यंत महत्त्वाचा निकड आहे. त्यामुळे आता महापालिकेने हॉकर्स झोनचा मुद्दा त्वरित निकाली काढावा, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे.

Web Title: 1,653 hawkers in municipal corporation 'smart card'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.