शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाला १६५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:55 PM

यंदा शैक्षणिक सत्र प्रारंभ होऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला असताना राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाला निधी मिळाला नव्हता. मात्र, केंद्र सरकारने या अभियानांतर्गत गट, शहर, समूह साधन केंद्राला अनुदान उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा वनवास संपला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची प्रकल्पाला मान्यता गट, शहर, समूह साधन केंद्रांचे आर्थिक संकट दूर

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा शैक्षणिक सत्र प्रारंभ होऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला असताना राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाला निधी मिळाला नव्हता. मात्र, केंद्र सरकारने या अभियानांतर्गत गट, शहर, समूह साधन केंद्राला अनुदान उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा वनवास संपला आहे. त्याकरिता १६५ कोटींचा निधी मिळाला आहे.समग्र शिक्षा अभियान हे राज्याच्या प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविले जाते. या अभियानात कर्मचारी करार पद्धतीने नियुक्त केले जातात. केंद्र सरकारने १० मे २०१८ रोजी प्रकल्प मान्यता बैठकीत समग्र शिक्षा अभियानाच्या शैक्षणिक सत्र २०१८-२०१९ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली आहे. यात गट, शहर व समूह साधन केंद्र उपक्रमाकरिता मंजूर तरतुदीचा योग्य पद्धतीने विनियोग करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाºयांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यात ४०८ गट, शहर साधन केंद्रांना प्रत्येकी सादिल अनुदान आणि बैठक, प्रवास भत्ता म्हणून अनुक्रमे २० हजार याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. ६,१७० समूह साधन केंद्रांना प्रत्येकी १० हजार याप्रमाणे सादिल अनुदान मंजूर होईल. तसेच बैठक, प्रवास भत्ता समूह साधन केंद्रांना प्रत्येकी १२ हजारप्रमाणे वितरित केला जाईल. समूह साधन केंद्राकरिता अध्ययन, अध्यापन साहित्य खरेदीसाठी प्रत्येक केंद्रांना १० हजार रूपये दिले जातील. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदकडे समग्र शिक्षा अभियानाचे नियंत्रण सोपविले आहे.गट, शहर साधन केंद्रांना असे मिळेल अनुदान (लाखात)६ विषय साधन व्यक्तीचे वेतन- ८०५६.००२ समावेशित शिक्षणाच्या साधन व्यक्तिचे वेतन - ३२६४.००१ एमआयएस समन्वयक- ५२८.००५० शाळांमागे एक लेखा लिपिक- नि. सहाय्यक -१२२४.९६सादील अनुदान- ८१.६०बैठक, प्रवास - ८१.६०टीएलई, टीएलएम अनुदान- ८१.६०समूह साधन केंद्रांना अनुदान मंजूर (लाखांत)सादिल अनुदान- ६१७.००बैठक, प्रवास- ७४०.४०टीएलई, टीएलएम अनुदान- ६१७.००प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षा अभियान हे महत्त्वाचा दुवा ठरावा, यासाठी केंद्र सरकारकडे अनुदान मिळणेसाठी पाठपुरावा करण्यात आला. राज्याला १६५ कोटी ९ लाख ४६ हजार रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या आर्थिक अडचणी लवकरच दूर होतील.- विशाल सोळंकी,प्रकल्प संचालक तथा आयुक्त , प्राथमिक शिक्षण परिषद पुणे

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र