शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

१४ वर्षीय बालिकेवर सामूहिक लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:43 PM

आईपासून दूर जाण्याचा विचार करून घराबाहेर पडलेल्या एका १४ वर्षीय बालिकेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी फे्रजरपुरा हद्दीत उघडकीस आली. लैंगिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना उशीरा रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

ठळक मुद्देफे्रजरपुरा हद्दीतील घटना : चार ताब्यात, मुलगी हरविल्याची होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आईपासून दूर जाण्याचा विचार करून घराबाहेर पडलेल्या एका १४ वर्षीय बालिकेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी फे्रजरपुरा हद्दीत उघडकीस आली. लैंगिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना उशीरा रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते.शहरातील एका १४ वर्षीय मुलीची आई धुणे-भांडीचे काम करीत असून, तिचे वडील मजुरी करतात. आई घरोघरी जाऊन काम करीत असताना ती १४ वर्षीय मुलगीसुद्धा आईच्या पाठोपाठ राहत होती. मात्र, १७ मे रोजी आई परिसरातील एका घरी धुणी-भांड्याचे काम करीत असताना तेथील घरमालकीने काही दस्तऐवज देऊन त्या मुलीला झेरॉक्स काढून आणण्यास पाठविले. परत आली असता, तिची आई दुसºयाच्या घरी कामासाठी गेली होती. त्यामुळे ती मुलगी तेथून बाहेर निघाली व काही क्षणात बेपत्ता झाली. मुलगी हरविल्याबाबत तिच्या आईने फे्रजरपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. १७ मे रोजी ती मुलगी त्या घरातून बाहेर पडल्यानंतर भिमटेकडी परिसरात गेली. तेथील बुद्ध विहारात आश्रय घेतला. १९ मे रोजी सायंकाळी ती महादेव खोरी भागात फिरत असताना तिला एक तरुण भेटला. भाड्याने खोली असेल, तर सांगा अशी विनंती त्या मुलीने तरुणाजवळ केली. त्यामुळे त्या तरुणाने पीडित मुलीला स्वत:च्या घराच आश्रय दिला. घरात सर्व कुटुंबीय असल्यामुळे त्या तरुणाने त्या मुलीला मागील दारातून खोलीत नेऊन रात्री तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसºया दिवशी ती मुलगी बाहेर निघू नये, यासाठी त्या तरुणाने तिला खोलीतच कोंडूनसुद्धा ठेवले.चारजण ताब्यात२० मे रोजी त्या तरुणाने परिसरातील एका मुलीला त्या पीडित मुलीसोबत थांबण्यास सांगितले. २० मे रोजीची रात्र दोघांही सोबत काढली. त्यानंतर २१ मे रोजी दोन्ही मुली भीमटेकडीवर गेल्या. तेथे सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एक ओळखीतील तरुण पीडित मुलीला भेटला. मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून त्याने पीडित मुलीला सोबत नेले. महादेवखोरी परिसरातील एका घरातील खोलीत नेऊन त्या तरुणासह आणखी दोन जणांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर २२ मे रोजी आरोपीपैकी एकाने पीडित मुलीला भीमटेकडीवर नेऊन सोडले. दरम्यान त्या परिसरात तिला आई व भाऊ भेटला. पीडित मुलीने घडलेला प्रकार कथन केल्यावर कुटुंबीय पीडित मुलीला घेऊन फे्रजरपुरा ठाण्यात आले. बुधवारी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.अधिक तपास पीआय आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनास एपीआय शुंभागी थोरात करीत आहेत. रात्री उशिरा फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.भीमटेकडीवरील अंध वृद्धेची नात म्हणून ती थांबलीआईपासून दूर जाण्यासाठी घराबाहेर पडलेली ती १४ वर्षीय मुलगी भीमटेकडीवर गेली होती. तेथे तिला एक अंध वृद्ध महिला भेटली. त्या अंध वृद्धेची नात दररोज येत असल्यामुळे त्या मुलीलासुद्धा ती वृद्धा नातच समजत होती. १७ व १८ मे असे दोन दिवस ती अंध वृद्धा पीडित मुलीला नात समजून आश्रय देत होती.लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचारअमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी फे्रजरपुरा हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणात पोलिसांनी श्रणीत दिवाकर राऊत (२५,रा.पाडा, मोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, फे्रजरपुरा हद्दीतील रहिवासी एक १९ वर्षीय विद्यार्थिनी सद्यस्थितीत बीए भाग १ ची विद्यार्थिनी आहे. तत्पूर्वी बारावीच्या परीक्षेनंतर मोर्शीतील एका महाविद्यालयात स्नेह संमेलनात तिची ओळख श्रणीतशी झाली. श्रणीतने तिला प्रेमाची विनवणी केली व लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. ४ जून २०१७ पासून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला एकदा मोर्शी येथील मित्र रितेश व संदेश यांच्या खोलीवर नेऊन लैंगिक शोषण केले. त्यानंतर पुण्याच्या लॉजवर व नागपूर येथे बोलावून श्रणीतने विद्यार्थिनी लैंगिक अत्याचार केले. तो गैरफायदा घेत असल्याचे कळताच त्या विद्यार्थिनीने लग्नासाठी तकादा लावला. दोघेही फे्रजरपुरा हद्दीतील प्रशांतनगर बगिच्याच आले. त्या ठिकाणी श्रणीतने पिडित मुलीशी वाद करून तिची मान पिरगळल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे.