कारच्या धडकेत १४ वर्षीय बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST2021-06-16T04:17:01+5:302021-06-16T04:17:01+5:30

रिद्धपूर : चांदूरबाजार तालुक्यातील रिध्दपूर बसथांब्यावर कारच्या धडकेत १४ वर्षीय बालक ठार झाला. श्री केचे (१३, रा. दाभेरी) असे ...

14-year-old boy killed in car crash | कारच्या धडकेत १४ वर्षीय बालक ठार

कारच्या धडकेत १४ वर्षीय बालक ठार

रिद्धपूर : चांदूरबाजार तालुक्यातील रिध्दपूर बसथांब्यावर कारच्या धडकेत १४ वर्षीय बालक ठार झाला. श्री केचे (१३, रा. दाभेरी) असे मृताचे नाव आहे. १३ जून रोजी सायंकाळी हा अपघात घडला. सोमवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या दाभेरी येथील गोपाल गुणवंतराव केचे (४२) हे मुलगा श्री सोबत १३ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एमएच २७ सीएम ७५०६ क्रमांकाच्या दुचाकीने दाभेरी येथून चांदूरबाजार येथे जात होते. रिद्धपूर बसस्टॉपजवळ मोर्शीहून चांदूरबाजारकडे जाणाऱ्या अज्ञात कारने दुचाकीला धडक दिली. यात श्री केचे हा गंभीर जखमी झाला. गोपाल व श्री केचे यांना चांदूरबाजार येथील रुग्णालयात उपचारार्थ नेले. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही अमरावती येथे उपचारार्थ हलविण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे १ ते २ वाजता दरम्यान श्री या चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोमवारी शोकाकूल वातावरणात त्याचेवर दाभेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: 14-year-old boy killed in car crash