१४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 21:44 IST2019-08-17T21:44:14+5:302019-08-17T21:44:38+5:30
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १४ ठाणेदारांच्या बदलीचे आदेश शनिवारी रात्री काढण्यात आले. यामध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ...

१४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १४ ठाणेदारांच्या बदलीचे आदेश शनिवारी रात्री काढण्यात आले. यामध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांची बदली राजापेठ ठाण्यात, तर तेथील पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी हे वाहतूक शाखेत बदली होऊन गेले आहेत.
याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची बदली नागपुरी गेट, पीआय अर्जुन ठोसरे वाहतूक शाखा, खोलापुरी गेटचे पुंडलिक मेश्राम यांची फे्रजरपुरा, राजापेठचे सेकंड पीआय किशोर शेळके यांची बदली खोलापुरी गेट, फ्रेजरपुºयाचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांची बदली पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेत, तर राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांची बदली वाहतूक शाखेत, खोलापुरी गेटचे सेकंड पीआय गजानन तामटे यांची नक्षलविरोधी कक्ष, तेथील विजय यादव यांची गाडगेनगर, गाडगेनगरचे विवेकानंद राऊत यांची दंगल नियंत्रण कक्ष, फ्रेजरपुºयाचे प्रवीण काळे यांची सायबर ठाणे, सायबरच्या सीमा दाताळकर यांची राजापेठ, नागपुरी गेटचे नितीन मगर यांची फ्रेजरपुरा, तर नियंत्रण कक्षातील संजय जव्हेरी यांची बदली नागपुरी गेट ठाण्यात झाली आहे.