१३ दिवसांत आढळले १०,२२६ कोरोना संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST2021-05-15T04:12:05+5:302021-05-15T04:12:05+5:30

अमरावती : शहरापेक्षा ग्रामीण भागात दररोज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एप्रिल ...

In 13 days, 10,226 corona infections were found | १३ दिवसांत आढळले १०,२२६ कोरोना संक्रमित

१३ दिवसांत आढळले १०,२२६ कोरोना संक्रमित

अमरावती : शहरापेक्षा ग्रामीण भागात दररोज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ११,३८६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले होते. १८६ जणांचा मृत्यू झाला. त्यातुलनेत १ ते १३ या १३ दिवसांत ग्रामीण भागात तब्बल १०,२२६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून, १७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिल महिन्यातील ३० दिवसांत ११,३८६ कोरोना संक्रमितांची नोंद झाली होती. मात्र, हा टप्पा मे महिन्यात १३ दिवसांतच गाठल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संक्रमित बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गत महिन्याभरात जिल्ह्यात १८६ जण कोरोनामुळे दगावले होते. आता १३ दिवसांत १७२ जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामीण भागात मृत्यूची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या १ ते १३ मे या १३ दिवसांत सर्वाधिक बाधित ९१५ रुग्ण ९ मे रोजी नोंदविले गेले. २ मे रोजी सर्वात कमी म्हणजेच ५७५ रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत.

बॉक्स

तारिखनिहाय आढळलेे रुग्ण व मृत्यू

दिनांक रुग्णसंख्या मृत्यू संख्या

१ मे ७११ ०६

२ मे ५७५ १६

३ मे ६२४ १४

४ मे ८९२ १८

५ मे ८१५ १६

६ मे ८८९ १५

७ मे ७८१ ०६

८ मे ८३९ १३

९ मे ९१५ १४

१०मे ६८८ ०९

११ मे ८६३ ०९

१२ मे ७७१ १७

१३ मे ८६३ १९

एकूण १०२२६ १७२

Web Title: In 13 days, 10,226 corona infections were found