शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अमरावती पदवीधरमध्ये 13 उमेदवार बाद, महाआघाडीच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 10:25 AM

दुपारी दोनपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता

गजानन मोडोह

अमरावती : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अवैध मतांच्या फेरमोजणीनंतर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना 43517 व भाजपचे डॉक्टर रणजीत पाटील यांना 41171 मते राहिली. यामध्ये 94200 मते वैध व 8387 मते पवई ठरली. त्यामुळे विजयी मताचा कोटा 47101 असा निश्चित झाला.

रात्री दोननंतर बाद फेरीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत बारा उमेदवार बाद होऊन त्यांच्या मतपत्रिकेवरील पहिल्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला देण्याचा प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे मतमोजणीला आणखी उशीर लागत आहे. सद्यस्थितीत धीरज लिंगाडे यांना विजयी मताचा कोटा पूर्ण करण्यास 3584 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास दुपारचे दोन वाजण्याची शक्यता आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारीला 1,02,403 मतदान झाले. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष 19 असे एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणीला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून धीरज लिंगाडे व रणजित पाटील यांच्यात चुरस होती. मात्र, प्रत्येक फेरीमध्ये लिंगाडे यांनी आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकAmravatiअमरावती