कापड बाजारात १२५ कोटींची उलाढाल

By Admin | Updated: May 31, 2015 00:06 IST2015-05-31T00:06:14+5:302015-05-31T00:06:14+5:30

विदर्भात कापडाच्या बाजारपेठेत अमरावती वरच्या क्रमांकावर आहे. संपूर्ण विदर्भातून ग्राहक येथील बाजारपेठेत कापड खरेदी ....

125 crore turnover in textile market | कापड बाजारात १२५ कोटींची उलाढाल

कापड बाजारात १२५ कोटींची उलाढाल

शहराच्या मध्यम भागात कापड बाजार : मुंबई, अहमदाबाद, सोलापूरमधून येतो माल
मनिष कहाते अमरावती
विदर्भात कापडाच्या बाजारपेठेत अमरावती वरच्या क्रमांकावर आहे. संपूर्ण विदर्भातून ग्राहक येथील बाजारपेठेत कापड खरेदी करण्यासाठी येतात. किरकोळ आणि होलसेलचा कापडाचा बाजार येथेच असल्याने ग्राहक अमरावती शहराला पसंती देतात. किरकोळ बाजारामध्ये १२५ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे.
शहरात तखतमल इस्टेट, जवाहर रोड, जयस्तंभ चौक, गांधी चौक, महावीर मार्केट, राजकमल चौक, नमुना गल्ली इत्यादी ठिकाणी कापडाचे सुमारे १५० दुकाने आहेत. त्यामध्ये छोटे दुकानदार अमरावतीच्या होलसेल कापड बाजारातून खरेदी करतात. तर किरकोळ मोठे दुकानदार मुंबई, इंदौर, सुरत, अहमदाबाद, दिल्ली, बंगलोर, कलकत्ता, सेलम, दिल्ली इत्यादी ठिकाणच्या बाजार पेठेतून कापड खरेदी करतात. देशाच्या ेकानाकोप्यातील कापडाचा माल अवघ्या आठवडाभरात अमरावतीमध्ये पोहचतो. किरकोळ कापड खरेदी करण्यासाठी विदर्भातील ग्राहक मोठ्या संख्येने येथे येतात. कारण येथील किरकोळ कापड बाजारात प्रचंड व्हेरायटी पाहयला मिळते. सोबतच नामांकित कंपनीचे कापड किफायतशीर भावामध्ये मिळते. येथील कापड बाजारात पॅन्टचे कापड १०० रुपये ते २००० हजार रुपये मिटरपर्यंत उपलब्ध आहेत. तर शर्टचे कापड १०० ते १५०० रुपये मिटरपर्यंत उपलब्ध आहेत.
कापडाच्या बाजारामध्ये पैजाम्याचे टेरीकॉट कॉपड, चड्डीचे पॉपलीन कापड, धोती, ब्लाउज पीस, दुपट्टा, टावेल, टोपी, रजाईखोळ, ब्लँकेट, शाल, देवाची वस्त्रे इत्यादी फाडी व कापडही किरकोळ बाजारात उपलब्ध आहे. संपूर्ण बाजारात नावाजलेल्या येथील किरकोळ कापड बाजारामध्ये अमरावतीचे नाव आहे. या किरकोळ कापड बाजारामध्ये सन १९०८ पासूनची कापडाची दुकाने आहेत. किरकोळ कापड बाजारात सुमारे १ हजार कामगार रोज काम करतात. त्यांना महिन्या ४ हजार ते २० हजार रुपये एवढे वेतन दिले जाते. वेतनाव्यवतिरीक्त कमिशनही दिले जाते.
बाजारामध्ये कॉटनच्या कापडाला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानात कॉटनच्या कापडाची मोठी रेंज उपलब्ध आहे. कॉटनलाच मागणी असण्याचे कारण म्हणजे टेरीकॉट कापड अंगात घातल्याने चर्मरोग, घाम येणे त्यामुळे ग्राहक कॉटनच्या कापडाला जास्त महत्त्व देतात.

किरकोळ बाजारपेठेमध्ये काही दुकानांमध्ये योग्य किंमत आहे.एकच भाव असल्याने ग्राहकांची फसवणूक होत नाही. जिथे भाव होतो तिथे माणूस नक्कीच फसतो.
- आप्पासाहेब बोबडे,
ग्राहक, जयरामनगर, अमरावती.

अमरावतीच्या कापड बाजारात ब्रान्डेड कापड कमी प्रमाणात आहे. मोठमोठ्या शोरुम लागायला पाहिजेत. ग्राहक उच्च प्रतीचे कापड खरेदी करतील. त्यात त्यांचाही फायदा होईल.
- आशीष मालू,
जयरामनगर, अमरावती

ग्राहकांचा विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा या आधारावर आमचा व्यवसाय सुरु आहे. तसेच कापडाची अमरावती मंडी जुनी असल्याने ग्राहक येथे येतात.
- राजेंद्र गगलानी,
पदाधिकारी, अमरावती किरकोळ कपडा व्यापारी संघ

कपड्याची रेंज अमरावती कापड बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु पाहिजे तशी उलाढाल होत नाही. यासाठी काही तरी केले पाहिजे.
- राजू केडिया,
उपाध्यक्ष, अमरावती रिटेल कपडा असोसिएशन,

Web Title: 125 crore turnover in textile market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.