चांदूर बाजारात १२० रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:11+5:302021-07-07T04:15:11+5:30
चांदूर बाजार : रक्तदान हे जीवनदान देत असल्याने श्रेष्ठ दान आहे. रुग्णाला उपचाराच्या वेळी रक्ताची गरज भासते. त्यावेळी रक्तपेढीमध्ये ...

चांदूर बाजारात १२० रक्तदात्यांनी केले रक्तदान
चांदूर बाजार : रक्तदान हे जीवनदान देत असल्याने श्रेष्ठ दान आहे. रुग्णाला उपचाराच्या वेळी रक्ताची गरज भासते. त्यावेळी रक्तपेढीमध्ये ते उपलब्ध नसल्यास जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे झाले आहे, असे मत पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले यांनी चांदूर बाजार येथे आयोजित रक्तदान शिबिरात केले. यावेळी पंचायत समिती सभापती वनमाला गणेशकर, पंचायत समिती सदस्य मुन्ना बोंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचा जयंतीनिमित्त चांदूर बाजार येथील द्रौपदा सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने याच दिवशी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस असल्याने प्रहार संघटना व लोकमत वृत्तपत्र समूह यांच्या संयुक्त सहभागाने हे शिबिर पार पडले. यावेळी चांदूर बाजारचे नगराध्यक्ष नितीन कोरडे, नगरसेवक सचिन खुळे, शिशिर माकोडे, सरदार खान, विशाल बंड, दीपक भोंगाडे, प्रदीप बंड, सुरेश गणेशकर, सरपंच मोहित देशमुख, प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख, छोटू नवघरे, अशोक अलोने, अजय गावंडे, सुमीत शेळके, प्रफुल नवघरे, योगेश पाथरे, अंकुश नाझीरकर, आदित्य ठोकळ, अतुल शेळके, अतुल राऊत, यश शेळके, सुनील मोहोड, अमोल ठाकरे हे होते. यासोबतच प्रहार विद्यार्थी संघटनेचे निखिल ठाकरे, अजिंक्य वाकोडे, वैष्णव राऊत, श्रीकांत तायडे, ऋषीकेश पोहोकार, सुमीत जुमडे, ऋषभ गावंडे, प्रणय इंगोले, प्रणव मोहोड, मोहम्मद रिजवान, ललित नागपूरकर, देवा मोरे, पोलीस शिपाई वीरेंद्र अमृतकर, निकेश नशीबकर, जवाभाई, बाळासाहेब वाकोडे, रणजित देशमुख, प्रफुल्ल खापरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला पंचायत समिती सदस्य मुन्ना बांडे, शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख, दीपक भंगाडे, प्रदीप बंड तसेच प्रहार विद्यार्थी संघटनेचे निखिल ठाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
रक्तदानाची जाण
रक्तदानाकरिता युवकांसह मोठ्या संख्येत महिला वर्ग व पोलीस शिपायांचा मोठा समावेश होता. रक्तदान ही काळाची गरज असल्याची जाण असलेले शेकडो नागरिकांनी या रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शविली होती.