दुसऱ्या टप्प्यातील ११५.३४ कोटी रुपये तालुक्यांना वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:23+5:302021-01-18T04:12:23+5:30
अमरावती : जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी व पुरामूळे शेती व फळपिकांचे ३,१४,८६९ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याकरीता शासनाने ...

दुसऱ्या टप्प्यातील ११५.३४ कोटी रुपये तालुक्यांना वितरित
अमरावती : जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी व पुरामूळे शेती व फळपिकांचे ३,१४,८६९ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याकरीता शासनाने वाढीव दराने मदत जाहीर केली. यापैकी पहिला टप्पा दिवाळीच्या पूर्वी देण्यात आला. तेवढाच ११५ कोटी ३४ लाख१३ हजारांचा दुसरा टप्पा सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात या आपत्तीमुळे ३,४५,६९५ शेतकऱ्यांच्या ३,००,७४ हेक्टरमधील जिरायती पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाने हेक्टरी १० हजार रुपये या वाढीव मदतीसह दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेत ३०० कोटी, ७ लाख, ४२ हजारांची मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाद्वारा करण्यात आली. यासोबतच २१,२२१ शेतकऱ्यांच्या १४,७९५ हेक्टरमधील बागायती पिकांचे नुकसान झाले. यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे ३६ कोटी ९८ लाख ९१ हजार ७५० रुपयांच्या मदतनिधीची मागणी करण्यात आलेली होती. अशी एकूण ३३७ कोटी, ६ लाख ३३ हजार ९५० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.
यंदाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यापासून पावसाने रिपरीप लावली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सतत पाऊस सुरू होता. या काळात अतिवृष्टीही झाल्याने शेतात पाणी साचून सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बाधित क्षेत्राचा संयुक्त सर्व्हे करण्यात येऊन मदतनिधीची मागणी शासनाकडे केली होती.
बॉक्स
तालुकानिहाय वितरित निधी
तालुका दुसरा टप्पा आतापर्यंत वितरित
अमरावती ९,९३,२०,८०० १९,८६,४१,६००
भातकुली ७,३६,०१,९५६ १४,७२,०३,९१२
तिवसा ६,८४,६८,५२० १३,६९,३७,०४०
चांदूर रेल्वे ८,०२,३०,९२५ १६,०४,६१,८५०
धामणगाव रेल्वे ८,८२,८१,४७६ १७,६५,६२,९५२
नांदगाव खंडेश्वर १३,४५,८७,८०० २६,९१,७५,६००
मोर्शी ६,२९,०८,४१० १२,५८,१६,८२०
वरुड २४,१६,४८,८८९ ४८,३६,९७,७७८
दर्यापूर ७,३९,३९,८०० १४,७८,७९,६००
अंजनगाव सुर्जी ६,५७,७५,५०० १३,१५,५१,०००
अचलपूर ३,७६,०६,१०८ ७,५२,१२,२१६
चांदूर बाजार ५,५०,२७,३०० ११,००,५४,६००
धारणी ३,९८,८०,५०४ ७,९७,६१,००८
चिखलदरा ३,१९,३५,०१२ ६,३८,७०,०२४
एकूण ११५,३४,१३,००० २३०,६८,२६,०००