आंतरजिल्हा बदलीसाठी ११ हजार शिक्षक इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST2021-09-11T04:13:56+5:302021-09-11T04:13:56+5:30

पान २ अमरावती/भातकुली : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी राज्यातील अंदाजित ११ हजार शिक्षक इच्छुक आहेत. कोरोनाकाळात आपल्या ...

11,000 teachers interested in inter-district transfers | आंतरजिल्हा बदलीसाठी ११ हजार शिक्षक इच्छुक

आंतरजिल्हा बदलीसाठी ११ हजार शिक्षक इच्छुक

पान २

अमरावती/भातकुली : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी राज्यातील अंदाजित ११ हजार शिक्षक इच्छुक आहेत. कोरोनाकाळात आपल्या जिल्ह्यात जाणारे इच्छुक खूपच आहेत. आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून आता ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र स्वॉप्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

नोकरीला लागताना सर्व प्रकारच्या अटी व शर्ती मान्य करून अनेकजण दुसऱ्या जिल्ह्यात सहशिक्षक पदावर रुजू झाले. पाच वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्यानंतर संबंधित शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरतो. दुसरीकडे, तो शिक्षक ज्या प्रवर्गातून त्या ठिकाणी रुजू झाला, त्या प्रवर्गाची जागा रिक्त असल्यानंतर त्याला आंतरजिल्हा बदलीतून संधी दिली जाते. मात्र, अनेक शिक्षकांनी बदलीसाठी प्रयत्न करूनही त्यांना त्यांच्या जिल्ह्यात बदली मिळालेली नाही. दुसरीकडे, जिल्हांतर्गत बदल्या दरवर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून केली जात होती. मात्र, त्यामध्येही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी काही शिक्षकांनी थेट ग्रामविकास विभागाकडे केल्या. त्यामुळे आता आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक स्वतंत्र स्वॉफ्टवेअर तयार केले आहे.

Web Title: 11,000 teachers interested in inter-district transfers