‘श्रीं’च्या ११० वर्षांपूर्वीच्या चरण पादुका येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:04 IST2018-01-30T22:03:59+5:302018-01-30T22:04:27+5:30

श्री गजानन महाराज बहुुुउद्देशीय संस्थाद्वारा ‘श्रीं’च्या ११० वर्षांपूर्वीच्या चरण पादुका अमरावतीत आणल्या जाणार आहेत.

The 110-year-old Padua of 110 years old will come | ‘श्रीं’च्या ११० वर्षांपूर्वीच्या चरण पादुका येणार

‘श्रीं’च्या ११० वर्षांपूर्वीच्या चरण पादुका येणार

ठळक मुद्देप्रकटदिन महोत्सव : भव्यदिव्य शिल्पकृती साकारणार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : श्री गजानन महाराज बहुुुउद्देशीय संस्थाद्वारा ‘श्रीं’च्या ११० वर्षांपूर्वीच्या चरण पादुका अमरावतीत आणल्या जाणार आहेत. ‘श्रीं’च्या प्रकटदिन महोत्सवाच्या पर्वावर १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान बडनेरा रोडवरील मलिका लॉनसमोरील प्रांगणातील सभामंडपात चरण पादुका दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल, अशी माहिती नगरसेवक प्रणीत सोनी, अध्यक्ष शुभम शेगोकार, आशिष ढोकणे, गणेश खारकर, परेश मोहोड, बाळासाहेब तांबसकर, नितीन शेरेकर, मनीष कारवा यांनी पत्रपरिषदेत दिली.
विदर्भात प्रथमच ‘श्रीं’च्या अध्यायांवर आधारित शिल्पाकृती देखावा साकारण्यात येणार असून, १ फेब्रुवारी रोजी ‘श्रीं’च्या पादुकांचे आगमन सभामंडपात होणार आहे. समर्थ हायस्कूल येथून ‘श्रीं’च्या चरण पादुकांची मिरवणूक रविनगर, शारदानगर, पन्नालालनगर, राजापेठ मार्गे पुन्हा कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम, शुक्रवारी श्रींची पालखी, मंगळवारी आरोग्य शिबीर, ८ फेब्रुवारी सायंकाळी ४ ते ६ हभप संदीप गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
बुलडाण्यावरून येणार ‘श्रीं’च्या पादुका
बुलडाणा येथील देशमुख यांच्या घरी १०८ वर्षांपूर्वी ‘श्रीं’च्या पादुकांचा स्पर्श लाभला. त्यांच्या नातीला साक्षात्कार झाल्यामुळे या पादुका दर्शनासाठी बाहेर काढण्यात आला आणि पहिल्यांदाच पादुका अमरावतीत आणल्या जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Web Title: The 110-year-old Padua of 110 years old will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.