शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ दीक्षांत समारंभात 110 सुवर्ण, 22 रौप्यपदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

संशोधकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी तसेच विद्याशाखानिहाय गुणवत्ता यादीनुसार ११० सुवर्ण, २२ रौप्यपदके, रोख २२  पारितोषिके तसेच ५५ हजार ३५९ पदवी व २४० पदविका या समारंभात विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आल्या. विशेषत: या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्देराज्यपालांच्यावतीने कुलगुरूंच्या हस्ते शंकरबाबांना डी.लिट. प्रदान

पारितोषिकांचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी पद्धतीने थाटात पार पडला. ३१६ संशोधकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी तसेच विद्याशाखानिहाय गुणवत्ता यादीनुसार ११० सुवर्ण, २२ रौप्यपदके, रोख २२  पारितोषिके तसेच ५५ हजार ३५९ पदवी व २४० पदविका या समारंभात विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आल्या. विशेषत: या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश माेहरील, वैशाली गुडधे, व्ही.डब्ल्यू. निचित, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य मीनल ठाकरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरूंनी केले. हा समारंभ कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून घेण्यात आला. राज्यपाल तसेच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना पदके, पारितोषिके जाहीर केले. या दीक्षांत समारंभात मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा तेजस राठी याने पटकावली. पाच सुवर्ण व एक रौप्यपदक त्याच्या खात्यात गेली. मुलींमध्ये अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची सारिका वणवे हिने सहा सुवर्ण, एक रोख पारितोषिक पटकाविले. ८३ विद्यार्थ्यांना पदकांनी गौरविण्यात येणार असून, यात ६५ मुली व १८ मुलांचा समावेश आहे. पदके पटकाविण्यात मुलीच आघाडीवर असल्याचे वास्तव आहे.दानदाते स्व. डी.एन. उपाख्य बबनराव मेटकर यांच्याकडून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतीप्रीत्यर्थ संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कारासाठी एक लक्ष रुपये अतिरिक्त दाननिधी प्राप्त झाल्याबद्दलची माहिती कुलसचिव  तुषार देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. संचालन मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे व प्रणव कोलते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने झाली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या चमूने गीताचे सादरीकरण केले.

शंकरबाबांच्या कार्याला मनस्वी दादसमाजसेवक  शंकरबाबा पापळकर यांना मानद मानवविज्ञान पंडित (डी.लिट.) ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन कुलपतींच्यावतीने कुलगुरू  मुरलीधर चांदेकर यांनी सन्मानित केले. त्यांना गौरवपत्र, शाल व गाडगेबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, समारंभाच्या प्रारंभी विद्यापीठाने चित्रफितीच्या माध्यमातून शंकरबाबांचा जीवनपट उलगडला. शंकरबाबांचे बालपण, शिक्षण आणि अनाथांचा बाप म्हणून १२३ मुला-मुलींचा सांभाळ करताना येणाऱ्या वास्तवाचे दर्शन झाले. डी.लिट. पदवी प्राप्त करण्यासाठी शंकरबाबा हे अनाथ मुलांसह विद्यापीठात उपस्थित झाले होते. अमरावती विद्यापीठाने शंकरबाबांना डी.लिट. पदवीने सन्मानित केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ना. नितीन गडकरी, ना. उदय सामंत यांनी मनोगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

 

टॅग्स :universityविद्यापीठ