शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:45 IST

तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून बैठकीचे आमंत्रण : पोलिसांच्या सतर्कतेने फसला जलसमाधीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/पुसला : तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्यांना वाचविले आणि स्थानबद्ध केले. उशिरा सायंकाळी सोडण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला आमंत्रित केले.पंढरी मध्यम प्रकल्पावर उपोषण करीत असलेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकाही सक्षम अधिकाºयानेच नव्हे, तर आ. अनिल बोंडे यांनीही भेट घेतली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी दुपारी १ वाजता ११ आंदोलकांनी पंढरी मध्यम प्रकल्पात उड्या घेतल्या. प्रकल्पस्थळी तैनात पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना ताब्यात घेऊन शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात आणले. विजय श्रीराव यांच्यासह शेतकरी नेते दिलीप भोयर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, गजानन डाहाके, चंद्रशेखर ढोरे, संजय कुरवाळे, राजू ठाकरे, नाना अजमिरे, अनिल कुयटे, सूर्यभान कुयटे, नरेंद्र कुरवाळे यांचा आंदोलनात समावेश होता. ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि मुंबई पोलीस कायदा ६८ नुसार कारवाई करून कलम ६९ नुसार सुटका केली. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम ठाकरे, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, छाया घ्यार, प्रकाश देशमुख, जगदीश बेलसरे, नंदू आजनकर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे आदींनी आंदोलनाला समर्थन दिले होते.मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आमंत्रणआंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला आणि सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अमरावती भेटीदरम्यान चर्चेचे आमंत्रण दिले.मुख्यमंत्र्यांसोबत अमरावती येथे रविवारी १५ जणांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. पालकमंत्र्यांना तसे कळविले आहे. योग्य मोबदला आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आमची मागणी राहणार आहे.- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप