शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बस-तवेराची जबर धडक, भीषण अपघातात ११ ठार; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

By गणेश वासनिक | Updated: November 4, 2022 18:19 IST

परतवाडा-बैतूल मार्गावरील घटना; अमरावती जिल्ह्यात आले होते पीक कापणीला, मेळघाटातून गावी परतताना झाला अपघात

परतवाडा (अमरावती) : गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता झालेल्या तवेरा व प्रवासी बस यांच्या अपघातात चारचाकी वाहनातील तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. घटनेतील सर्व मृतक मध्यप्रदेश येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परतवाडा- बैतूल या आंतरराष्ट्रीय महामार्गावरील जल्लार बुधगाव दरम्यान खासगी प्रवासी बस आणि तवेरा चारचाकी वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण ११ जण ठार झाले असून एकाच परिवारातील पाच लोकांचा समावेश आहे. त्यात दोनच चिमुकले आहे. मेळघाट व त्याच्या सीमा रेषेवरील मध्यप्रदेशच्या आदिवासी पाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबे विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतातील पीक कापणीसाठी मागील दीड महिन्यापासून वास्तव्याला होते. पीक कापणीचे कामे आटोपत असल्याने दिवाळीपूर्वी अनेक कुटुंब आपले गावी गेले तर काही आता जात आहे. अशातच एका चारचाकी वाहनात रात्रीचा प्रवास ११ जणांच्या जीवावर बेतला आहे.

राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

परतवाडा- बैतूल मार्गावर झालेल्या या भीषण अपघातात मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी दोन लक्ष रुपये देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली असून या घटने संदर्भात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहेमृतात मध्य प्रदेशचे गरीब मजूर

गुरुवारी मध्यरात्री २ वाजता अपघात झाल्यानंतर पहाटे अपघातातील मृतके परतवाडा, मेळघाटच्या धारणी, चिखलदरा व इतर परिसरातील असल्याची चर्चा होती. मात्र, मध्य प्रदेश प्रशासनाने सर्व मृतक बैतूल व परिसरातील असल्याचे जाहीर केले आहे. मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस व प्रशासनाला मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागलेविरुद्ध दिशेने येताना झाला बस-चारचाकी भिडले

अमरावती जिल्ह्यातून शेतीचे कामे आटोपून जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात झल्लार येथील एक, चिखलार व महाडगाव येथील प्रत्येकी पाच अशा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात अमर दुर्वे, मंगल सिंह विके, नंदकिशोर धुर्वे, श्यामराव धुर्वे, कली शामराव धुर्वे, किसन लीलाजी, कुसुम किसन धुर्वे, अनारकली केसा, संध्या केसा, विकास मधू आदी मृतकांची नाव आहेत

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावतीbetul-pcबेटुल