शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

‘108’ ने वाचविले 1800 जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 5:00 AM

कोरोनाकाळात संचारबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारशी नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्के अपघाताच्या घडल्या. यामध्ये तातडीने उपचार मिळवून देण्यात १०८ रुग्णवाहिकांनी मोलाची कामगिरी बजावल्याची माहिती झोनल असिस्टंट अक्षय देशमुख यांनी दिली. सेवा प्रारंभ केल्यापासून अकोला झोनमधील ६ लाख ४७ हजार ६६९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत जिवंत राहण्यास मदत झाली. यामध्ये आरटीए, गर्भवती, कार्डियाक रुग्णांचा समावेश राहिला.  

ठळक मुद्दे ६.४९ लाख रुग्णांना सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अकोला झोन अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या एक वर्षाच्या काळात ४ लाख ५०४ अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये १८०० अपघातग्रस्तांना ‘डायल १०८’ रुग्णवाहिकांद्वारे तातडीने रुग्णालयात पोहचविल्यामुळे जीवदान मिळाला.कोरोनाकाळात संचारबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारशी नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्के अपघाताच्या घडल्या. यामध्ये तातडीने उपचार मिळवून देण्यात १०८ रुग्णवाहिकांनी मोलाची कामगिरी बजावल्याची माहिती झोनल असिस्टंट अक्षय देशमुख यांनी दिली. सेवा प्रारंभ केल्यापासून अकोला झोनमधील ६ लाख ४७ हजार ६६९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत जिवंत राहण्यास मदत झाली. यामध्ये आरटीए, गर्भवती, कार्डियाक रुग्णांचा समावेश राहिला.  सन २०१४ ते २०२० या कालावधीत वाशिम जिल्ह्यात ७१ हजार ३०१ रुग्णांना सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघाताच्या घटनांतील ५ हजार ९६१ रुग्णांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८५७ रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये रस्ते अपघातातील ११ हजार १६८ रुग्णांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ६२५ रुग्णांना सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघातातील १० हजार २९२ रुग्णांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख १ हजार ४६६ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघातातील १३३९५ रुग्णांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख २ हजार ४२० रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यात ५७२५ रुग्ण रस्ते अपघातातील आहेत.समुदायाला आ‌वाहन१०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल करा आणि अपघाताचा अचूक पत्ता द्या. पीडित व्यक्तीजवळ राहा आणि १०८ कॉल सेंटर किंवा डॉक्टरांकडून आलेल्या ऑनलाईन सूचनांचे अनुसरण करा. पीडितेला हलवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आणखी नुकसान होईल. शक्य असल्यास रक्तस्त्राव थांबवा, असे आवाहन केले.अकोला झोन अंतर्गत २१२ रुग्णवाहिका २४ तास रुग्णांच्या सेवेत आहेत. आमचे डॉक्टर, चालक हे केवळ कोविडयोद्धेच नव्हे, तर खरे जीव वाचविणारे देवदूत आहेत.- डॉ. दीपककुमार उके, विदर्भप्रमुख, महाराष्ट्र इमर्जंसी मेडिकल सर्व्हिस (एमईएमएस)

टॅग्स :Accidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या