कोविड संकटात १०८ रुग्णवाहिकांची १४ हजार रुग्णांना सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:09+5:302020-12-12T04:30:09+5:30
फोटो जे-११-अमरावती- अँबलन्स अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत १०८ मोफत रुग्णवाहिकेने जिल्ह्यातील १ लाख ...

कोविड संकटात १०८ रुग्णवाहिकांची १४ हजार रुग्णांना सेवा
फोटो जे-११-अमरावती- अँबलन्स
अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत १०८ मोफत रुग्णवाहिकेने जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ६३ रुग्णांना सेवा दिली आहे. यामध्ये १४०१० कोरोना संबंधित रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात १०८ टोल फ्री क्रमांकाच्या २९ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यावर ६२ चालक व ५१ डॉक्टर कार्यरत आहेत. त्यापैकी आठ रुग्णवाहिका कोविड संकटात रुग्णांच्या सेवेत होत्या. त्यावरील तीन डॉक्टर व ३ चालकांना कोरोनाची बाधा झाली होती.
जिल्ह्यातील अमरावतीत ४, वरूड १, मोर्शी १, अचलपूर १, दर्यापूर १ मेळघाटात ७, धामणगाव रेल्वे १, चांदूर रेल्वे १, चांदूर बाजार १, अंजनगाव सुर्जी १, भातकुली १, तिवसा १, नांदगाव खंडेश्वर१, येवदा, कुर्हा, मंगरुळ चव्हाळा, लोणी टाकळी या आरोग्य केंद्रात प्रत्येक १ व बडनेरा मोदी हॉस्पिटलला १ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
रस्ता अपघात व हृदयविकाराच्या १३१७९ रुग्णांना तात्काळ उपचार मिळू शकले. सर्पदंश झालेले १०७३ रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात आले. प्रसूतीकिरता ८६१ महिलांना वेळेत पोहचविल्याने त्यांना योग्य उपचार घेता आले.
कोट
सन २०१४ पासून जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. आतापर्यंत १.९७ लाखांवर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात आले. कोविड संकटात रुग्णसंख्या वाढल्याने नियोजन करताना तारांबळ उडाली होती.
- नरेंद्र अब्रुक,
जिल्हा व्यवस्थापक, अमरावती