भातकुली तालुक्यात रबीची १०३ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:06+5:302020-12-11T04:39:06+5:30
फोटो पी टाकरखेडा पी १० पान ३ टाकरखेडा संभू : खरिपानंतर आता शेतकरी रबी हंगामात व्यस्त आहे. भातकुली तालुक्यात ...

भातकुली तालुक्यात रबीची १०३ टक्के पेरणी
फोटो पी टाकरखेडा पी १०
पान ३
टाकरखेडा संभू : खरिपानंतर आता शेतकरी रबी हंगामात व्यस्त आहे. भातकुली तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ३९ हेक्टर क्षेत्रात रबीची लागवड करण्यात आली आहे. यात ७ हजार ७१६ हेक्टरवर हरभऱ्याची लागवड केलेली आहे.
यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली. पेरणी क्षेत्रात कपाशी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. परंतु अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे पीक गेल्याने शेतकरी आता रबीवर अवलंबून आहे. आर्थिक घडी बसविण्यासाठी रबी पेरणीदेखील ताकदीने करण्यात आली आहे. भातकुली तालुक्यात ८ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रापैकी ८ हजार ३९ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली. यामध्ये १०६ टक्के हरभऱ्याची पेरणी झाली. त्यापाठोपाठ गहू, कांद्याची ३०० हेक्टरवर, तर इतर पिकांची २२ हेक्टरवर लागवड करण्यात आली.