शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात १०० पथके, ६०० कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:10 AM

(असाईनमेंट) अमरावती : कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग झपाटल्यागत कामाला भिडला आहे. यासंदर्भात व्हीसीद्वारे नियमित आढावा अन् जिल्हधिकाऱ्यांच्या बैठकी ...

(असाईनमेंट)

अमरावती : कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग झपाटल्यागत कामाला भिडला आहे. यासंदर्भात व्हीसीद्वारे नियमित आढावा अन् जिल्हधिकाऱ्यांच्या बैठकी सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या प्राथमिक नियोजनानुसार जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रत्येकी सहा सदस्यांची १०० पथके राहणार आहेत. हे प्राथमिक नियोजन असल्याने यामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

यासंदर्भात जिल्ह्याचा व महापालिका स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आले व दोन्ही पथकांची पहिली आढावा बैठक झालेली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या २० ते २१ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लस साठवणुकीकरिता शीतकरण केंद्र तयार करण्याचे व लसीकरणासाठी केंद्र तयार करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यात ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा डेटा संगणकात एंट्री करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे सध्या मायक्रो प्लाॅनिंग सुरू आहे.

लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, एनएम, एएनएम, एमपीडब्लू याशिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर याशिवाय खासगी डॉक्टर व त्यांचा स्टॉफ यांची माहिती संकलित करण्यात आलेली आल्याची माहिती सीएस डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.

बॉक्स

२१ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिले लस

कोरोना संर्सगाचे काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणारे आरोग्य विभागाचे २० ते २१ हजार कर्मचाऱी व खासगी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर यांना सर्वप्रथम लस देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रातील कोरोना वॉरिअर्सची माहिती संकलित करायला वेळ लागल्याने ही माहिती संगणकात भरण्यासाठी आता वेळ लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

बॉक्स

सर्व टीम मेंबरना प्रशिक्षण

लसीकरणासाठी जिल्ह्यात १०० टीम तयार करण्यात आल्या व या पथकांमध्ये ६०० सदस्य राहणार आहे. यामध्ये एक डॅाक्टर, दोन एएनएम, एक मोबलायझर,एक अटेंडंट व एक सुरक्षा रक्षक राहणार आहे. या सर्व सदस्यांना प्राथमिक स्वरूपात लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. लस कोणती येणार व लसीकरण कसे करणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

पाईंटर

असे लागणार मनुष्यबळ

एकूण कर्मचारी - ६००

वैद्यकीय अधिकारी - १००

वैद्यकीय कर्मचारी २००

परिचारिका -२००

अटेंडंट १००