१०० ग्रॅ्रम सोने, ७ किलो चांदी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:40+5:30

ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी चांदूर बाजारात धनंजय गोविंद सापधरे (रा. चांदूर बाजार) यांच्या मालकीच्या भवानी ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती. त्यांच्या दुकानातून चोरांनी तब्बल ३५ लाखांचे सोन्या-चांदीचे ऐवज लंपास केले होते.

100 gram of gold, 7 kg of silver seized | १०० ग्रॅ्रम सोने, ७ किलो चांदी जप्त

१०० ग्रॅ्रम सोने, ७ किलो चांदी जप्त

ठळक मुद्देएकाला मुंबईतून अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्वेलर्स शॉपी फोडणाऱ्या राज्यस्तरीय टोळीतील आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पंकजसिंग कालुसिंग दुधानी (४५, रा. अंबरनाथ मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सात किलोची चांदी व १०० गॅ्रमचे सोने जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी या टोळीतील तीन आरोपींना अटक करून १७ तोळे सोने व ८०० गॅ्रमची चांदी जप्त केलेली आहे.
ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी चांदूर बाजारात धनंजय गोविंद सापधरे (रा. चांदूर बाजार) यांच्या मालकीच्या भवानी ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती. त्यांच्या दुकानातून चोरांनी तब्बल ३५ लाखांचे सोन्या-चांदीचे ऐवज लंपास केले होते. घटनेच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि तिघांना मुंबईतून अटक केली होती. त्यांच्याकडून १७ तोळे सोने व ८०० ग्रॅ्रम चांदी जप्त करण्यात आली होती. याच गुन्ह्यातील आणखी एक आरोपी पसार झाला होता. या आरोपीचा मागोवा घेऊन पोलिसांनी त्याला मुंबईवरून अटक केली. त्याच्याकडे चोरीतील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल असल्याचे यापूर्वी अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले होते. आरोपी पंकजसिंग दुधानीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून सात किलोची चांदी (३ लाख ५० हजार रुपये) व १०० गॅ्रम सोने (४ लाख रुपये) असा एकूण ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी पत्रपरिषेदतून पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी दिली.

दोन पथकांची कामगिरी
पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक शाम घुहे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किगने यांच्या मार्गदर्शनात परतवाडाचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांच्या नेतृत्वात चांदूर बाजार पोलिसांच्या मदतीने सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, अशोक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस कर्मचारी अनिल वासनिक, योगेश सांबारे, पुरुषोत्तम बावनेर, अशोक दहिकर, अंबाडकर, श्रीकांत वाघ व सचीन मिश्रा यांचे पथक मुंबईकडे रवाना झाले होते. या दोन्ही पथकाने शिताफीने आरोपीला अटक करून अमरावतीत आणले.

वर्धा, नागपूर जिल्ह्यातील दुकाने फोडल्याची कबुली
या चोरांच्या राज्यस्तरीय टोळीने चांदूर बाजार, परतवाडासह नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील सराफा दुकाने फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: 100 gram of gold, 7 kg of silver seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर