अचलपुरात साकारणार १०० खाटांचे महिला रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:44 IST2018-03-18T22:44:31+5:302018-03-18T22:44:31+5:30
तालुक्यातील रुग्णांसाठी येथे १०० खाटांचे अद्ययावत महिला रुग्णालय साकारणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली. राज्य शासनाने या रुग्णालयास मंजुरी दिली असून, लवकरच हे रुग्णालय मूर्तरूपास येणार असल्याचे ते म्हणाले.

अचलपुरात साकारणार १०० खाटांचे महिला रुग्णालय
आॅनलाईन लोकमत
अचलपूर : तालुक्यातील रुग्णांसाठी येथे १०० खाटांचे अद्ययावत महिला रुग्णालय साकारणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली. राज्य शासनाने या रुग्णालयास मंजुरी दिली असून, लवकरच हे रुग्णालय मूर्तरूपास येणार असल्याचे ते म्हणाले.
अचलपूर मतदारसंघाला लागूनच मेळघाटातील धारणी व चिखलदरा हे तालुके आहेत. कुपोषण व मातामृत्यूचे प्रमाण या भागात अधिक आहे. मेळघाटमधील कुपोषित बालके व इतर गंभीर आजारी रुग्णांना एवढ्या अंतरावर उपचाराकरिता न्यावे लागते. अचलपूर, अंजनगाव, चांदूरबाजार येथील बरेच रुग्ण उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात येतात. ही अडचण दूर करण्यासाठी येथे १०० खाटाचा महिला रुग्णालय व्हावे, असा प्रस्ताव शासनाकडे मांडला. शासनाने ही मागणी मंजूर केली असल्याचे आ. कडू म्हणाले.
जिल्हा रुग्णालयाचा दर्जा
महिला रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सी.टी. स्कॅन मशीन मंजूर झाली आहे. येथेच ब्लड बँकेची व्यवस्थाही राहणार आहे.