हंतोडा शिवारातून १०० कांद्याचे पोते लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:43+5:302021-06-29T04:10:43+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून, सोमवारी हंतोडा येथील शेतकरी सतीश दामोदर तायडे (३९) यांनी २ एकर ...

हंतोडा शिवारातून १०० कांद्याचे पोते लंपास
अंजनगाव सुर्जी तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून, सोमवारी हंतोडा येथील शेतकरी सतीश दामोदर तायडे (३९) यांनी २ एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. त्यात त्यांना १०० पोते कांद्याचे उत्पादन झाले होते. त्यांच्याकडे कांदे साठवणूक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी त्यांचे मावसभाऊ बाबुराव भूजंगराव उंबरकर यांच्या शेतातील शेडमध्ये ठेवले होते. साठवणूक केलेला कांद्या २७ जून रोजी मजुरांकडून साफ करण्यासाठी काढला असून, २०० पोत्यांमधून १०० पोते मजुरांकडून साफ करून त्याचे तोंड न बांधता तेथेच ठेवले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता बाकीचा कांदा साफ करण्यासाठी मजुरांना शेतात नेले असता, तेथे ५० हजार रुपये किमतीचे कांद्याचे १०० पोते गायब झाझाले. याची तक्रार शेतकरी सतिश तायडे यांनी अंजनगाव सुर्जी ठाण्यात दिली असता, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञाताविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा केेला आहे.