शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 16:23 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ कोटी खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ कोटी खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात ३३ टक्के जमीन ही वृक्षाच्छादनाखाली आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरकस प्रयत्न चालविले आहे. मागील महिन्यात वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने विभागीय स्तरावर दौरे करून वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य यंत्रणांना वृक्षलागवडीसाठी दिलेल्या बाबीकडे शासनाने बारकाईने लक्ष वेधले आहे. १ जुलैपासून होणारी वृक्ष लागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार घेतला जात आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्षलागवड कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज हाताळतील, असे शासनादेश आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवडीत वृक्षारोपणाचा दिखाऊपणा असणार नाही, त्याकरिता सर्वच यंत्रणांची ‘क्रॉस’ चेकींग सुरू झाली आहे. खड्डा खोदल्यानंतर त्याचे छायाचित्र ‘माय प्लँट अ‍ॅप’वर अपलोड केले जात आहे. त्यामुळे वृक्षारोपण आता कागदोपत्री राहणार नसून, रिझल्ट द्यावा लागत आहे. 

२० कोटी रोपांची निर्मिती१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्षलागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात सामाजिक वनीकरणांच्या २,१४२ नर्सरीत २० कोटी रोपांची निर्मिती झाल्याची माहिती पुणे येथील सामाजिक वनीकरणाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सामाजिक वनीकरणाच्या नियंत्रणात स्वतंत्रपणे ८५ हजार ८०६ स्थळे वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे. २० कोटी रोपांपैकी १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास लवकरच ७ कोटी रोपांचे नियोजन केले जाईल, असे दिनेश त्यागी यांनी सांगितले.

१३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी शासनस्तरावरून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार वजा आवाहन केले आहे. - सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र