शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

श्री गणेश मंडळाला १ लाखाचे बक्षीस

By admin | Updated: April 13, 2017 00:09 IST

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन- २०१६ च्या गणेशोत्सव दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत...

शासनाचा उपक्रम: ग्रामीणमध्ये १६ पारितोषिकांचे वितरण अमरावती : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन- २०१६ च्या गणेशोत्सव दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत गणेश सजावट स्पर्धा, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पारितोषिक प्राप्त गणेश मंडळास येथील टॉऊन हॉलमध्ये बुधवारी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे एक लक्ष रुपयांचे पारितोषिक टोपेनगरातील श्री गणेशोत्सव मंडळाने पटकाविले. धनादेश, स्मृतीचिन्ह देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य दिलीप काळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीक्षक अलका तेलंग, किरण पातुरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हास्तरावरील व्दितीय क्रमांकाचे ७५ हजाराचे पारितोषिक अचलपूर तालुक्यातील विनायकरपुरा येथील नागराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाले. तृतीय पारितोषिक श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ, दर्यापुरने पटकाविले. त्यांना रोख ५० हजार रुपये बक्षीस देण्यात आले.ग्रामीण भागातील ६ तालुक्यातील १६ गणेश मंडळाची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली होतीे. यामध्ये प्रथम २५ हजार, व्दितीय १५ हजार, तृतीय १० हजारांचा धनादेश प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे स्वरुप होते. यामध्ये अचलपूर तालुक्यातील नागराज सार्वजनिक गणेश मंडळ, विनायकरपूरा प्रथम, लोकमान्य उत्सव समिती शिंदी बु.व्दितीय , अमरावती तालुक्यातील श्री गणेश मंडळ टोपेनगर प्रथम, बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा तर तृतीय श्री एकविरा युवक गणेशोत्सव मंडळ गौरक्षण चौक यांनी पटकाविले. चांदूररेल्वे तालुक्यातून प्रथम पारितोषिक राजे छत्रपती गणेशोत्सव मंडळ सरदार चौक माळीपुरा, व्दितीय वीर संभाजी मंडळ, तर दर्यापूर तालुक्यातील श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळास प्रथम, युवा शिवशक्ती मंडळ व्दितीय, श्री गणेशा फांऊडेशन गांधी चौक येवदा तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मोर्शी तालुक्यातून प्रथम अभिमन्यू गणेशोत्सव मंडळ , व्दितीय सुर्योदय गणेशोत्सव मंडळ, तृतीय सत्संग गणेश मंडळ यांना बहाल करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रथम शिवाई गणेशोत्सव मंडळ, व्दितीय एकलव्य गणेशोत्सव मंडळ, तृतीय गणपती संस्थान गणेशोत्सव मंडळ टाकळी (बु) मंडळाना पारितोषिकांचे वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक अलका तेलंग यांनी तर संचालन पंकज ठाकूर यांनी केले. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या संख्येने होती.