दर्यापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक पथकाने मंगळवारी ३ लाख ६३ हजार २७२ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील कोकर्डा-उमरी फाट्याजवळ वडाळगव्हाण येथे ही कारवाई करण्यात आली.एमएच २७ एसी ५७२२ या चारचाकी वाहनातून ३२ कागदी खोक्यातून १८० मिलिच्या एकूण १५३६ बॉटल व नऊ कागदी खोक्यातून ९० मिलीच्या ९०० बॉटल असा ३ लाख ६३ हजार २७२ रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी अक्षय अरुण ढोके (२५, रा. उमरी इतबारपूर, ता. दर्यापूर) याला अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शैलेश ठाकूर, दिनकर तिडके व वाहनचालक सुजित जाधव यांनी ही कारवाई केली. स्थानिक पोलीस त्यापासून अनभिज्ञ होते.
३ लाख ६३ हजारांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:12 IST
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक पथकाने मंगळवारी ३ लाख ६३ हजार २७२ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील कोकर्डा-उमरी फाट्याजवळ वडाळगव्हाण येथे ही कारवाई करण्यात आली.
३ लाख ६३ हजारांची दारू जप्त
ठळक मुद्देपोलीस अनभिज्ञ : कोकर्डा-उमरी फाट्यानजीक कारवाई