अवैध गांजासह १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:22+5:302021-06-29T04:10:22+5:30
अमरावती : पोलीस आयुक्त व शहर गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील चांदूररेल्वे मार्गावरील वैष्णवदेवीच्या मंदिराजवळ नाकाबंदी कारवाई करून ...

अवैध गांजासह १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त
अमरावती : पोलीस आयुक्त व शहर गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील चांदूररेल्वे मार्गावरील वैष्णवदेवीच्या मंदिराजवळ नाकाबंदी कारवाई करून दोघांच्या ताब्यातून ४३,५२० रुपयांचा गांजा व दोन दुचाकी असा एकूण १ लाख ४८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
शेख मुस्ताक शेख मुसा (५३, रा. वडाळी), फिरोज खान अन्नू खान (३६, रा. व्यंकय्यापुरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून ४ किलो ३५२ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे, पोलीस काॅन्सटेबल सूरज चव्हाण यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, पोलीस जमादार राजेंद्र काळे, काठेकर, सुलतान यांच्या पथकाने सदर कारवाई केली. दोन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत कारवाई केली.