झोननिहाय डम्पिंग ग्राउंडचे नियोजन कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:17 IST2017-08-26T01:17:17+5:302017-08-26T01:17:24+5:30

कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. कचर्‍याच्या समस्येमुळे अक ोलेकर त्रस्त झाले असताना सत्ताधारी व प्रशासनाचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. 

Zonnihay dumping grounds on planning paper | झोननिहाय डम्पिंग ग्राउंडचे नियोजन कागदावर

झोननिहाय डम्पिंग ग्राउंडचे नियोजन कागदावर

ठळक मुद्देकचर्‍याच्या समस्येमुळे अकोलेकर त्रस्तसत्ताधारी-प्रशासनाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. कचर्‍याच्या समस्येमुळे अक ोलेकर त्रस्त झाले असताना सत्ताधारी व प्रशासनाचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. 
नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी साठवणूक होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचर्‍याचे ढीग साचले आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कचर्‍यामुळे परिसरातील पाण्याचे जलस्रोतदेखील दूषित झाले आहेत. शिवाय, स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. 
शहरातील कचरा घेऊन जाणार्‍या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’वरील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक असताना महापालिका झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्याच्या तयारीत असून, त्यानुषंगाने जागेचा शोध घेतला जात आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणूक करण्यास स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळे घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून मोकळे होत आहेत. परिणामी, शहरात साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. एकूणच, कचर्‍याची बिकट समस्या ध्यानात घेता प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जागेसाठी शोधाशोध पण..
घनकचर्‍याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असले, तरी ठोस उपाय निघत नसल्याची परिस्थिती आहे. मध्यंतरी आयुक्त लहाने यांनी मनपात सामील झालेल्या नवीन प्रभागांमधील शासकीय जमिनींची पाहणी केली होती. त्यामध्ये शिलोडा, गुडधी, शिवणी, शिवर परिसरातील ‘ई-क्लास’ जमिनीचा समावेश होता. २0 ते २५ एकर जमिनीवर एकाच ठिकाणी कचरा साठवणूक करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

मनपाचा प्रयोग धोक्याची घंटा?
मनपाने झोननिहाय डम्पिंग ग्राउंड निर्माण करून कचरा साठविल्यास शहराच्या चारही बाजूंनी दुर्गंंधीची समस्या निर्माण होऊन जलस्रोत दूषित होतील, यात दुमत नाही. त्यामुळे मनपाचा हा प्रयोग अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार तयार केलेल्या मैदानावर कचरा साठवल्यास प्रदूषणाची तीव्रता काहीअंशी कमी होईल, असे मैदान तयार करण्याची प्रशासनाची तयारी आहे का, यासंदर्भात सत्ताधारीच नव्हे, तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे.

Web Title: Zonnihay dumping grounds on planning paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.