जिल्हा परिषद , मनपा पदाधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:12 IST2019-03-12T13:11:43+5:302019-03-12T13:12:34+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सहा आणि महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या तीन अशा नऊ शासकीय गाड्या १० मार्च रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या

जिल्हा परिषद , मनपा पदाधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या जमा!
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सहा आणि महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या तीन अशा नऊ शासकीय गाड्या १० मार्च रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १० मार्च रोजी सायंकाळापासून लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती अशा सहा पदाधिकाºयांच्या शासकीय सहा गाड्या (कार) जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या. तसेच महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती अशा तीन पदाधिकाºयांच्या तीन शासकीय गाड्या मनपा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.