जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:22 PM2019-12-24T12:22:13+5:302019-12-24T12:22:19+5:30

हातरूण गटात भाजपच्या माजी महिला सदस्या सुनीता गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Zilla Parishad Elections: Shiv Sena too for the first time independently | जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे रिंगणात

जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे रिंगणात

Next

अकोला : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच शिवसेनेने बहुसंख्य जागांवर उमेदवार देत लढतीत रंगत आणली आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारी दिलेल्या उमेदवारांमध्ये पक्षाचे पदाधिकारी असलेले उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, ज्योत्स्ना चोरे, मुकेश मुरूमकार, माजी सदस्य महादेव गवळे, विजय मोहोड यांच्या पत्नीला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी हातरूण गटात भाजपच्या माजी महिला सदस्या सुनीता गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अकोला तालुक्यातील आगर गटात रेणुका नागोराव सोळंके, दहीहांडा- गोपाल रामराव दातकर, घुसर- विकास पागृत, उगवा- महादेव गवळे, बाभूळगाव- मुकेश मुरूमकार, कुरणखेड- कमल गणेश गावंडे, कानशिवणी- वर्षा अरविंद पिसोडे, बोरगाव मंजू- प्रीती जगदीश विल्हेकर, चांदूर- रोशनी विश्वनाथ मोरे, चिखलगाव- सरिता विजय वाकोडे.
बाळापूर तालुक्यातील अंदुरा गटात गणेश समाधान तायडे, हातरूण- सुनीता सुरेश गोरे, निमकर्दा- मीना रवींद्र पोहरे, व्याळा- वर्षा गजानन वजिरे, पारस- लक्ष्मी संतोष साबे, देगाव- ज्ञानेश्वर महादेव म्हैसने, वाडेगाव- अरुण मोतीराम पळसकार.
पातूर तालुक्यातील शिर्ला गटात अरुण कचाले, चोंढी- देवलाल डाखोरे, विवरा- अंकुश आनंदराव बरडे, सस्ती- संदीप तुकाराम सरदार, पिंपळखुटा- लता पंजाबराव पवार, आलेगाव- संगीता वामन राठोड.
बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप गटातून गोपाल रामदास भटकर, दगडपारवा- पुष्पा मधुकर ढोरे, पिंजर अनुराधा उत्तम राऊत, जनुना- शैलेश नामदेव ठाकरे, महान- वंदना किशोर हजारे, राजंदा- गणेश लक्ष्मण बोबडे, जांब वसू- उमेदवार नाही.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गटातून संजय पांडुरंग अढाऊ, दानापूर- मयूरा माधव विखे, हिवरखेड- सिंहली सूर्यभान ढोले, अडगाव बुद्रूक- हर्षा गोकुल आंबेकर, तळेगाव खुर्द- डॉ. मोनिका तराळे, पाथर्डी- विजय श्रीराम दुतोंडे, दहीगाव- स्मिता विजय मोहोड, भांबेरी- पांडुरंग मारोती चिमणकर.
अकोट तालुक्यातील उमरा गटातून नीळकंठ नामदेव मेतकर, अकोलखेड- श्याम हरिभाऊ गावंडे, अकोली जहागीर- गीता राजेंद्र मोरे, आसेगाव बाजार- श्रीजित रामेश्वर कराळे, मुंडगाव- तुषार रमेश पाचकोर, वरूर- डॉ. प्रशांत अढाऊ, कुटासा- सुनीता शिवप्रसाद भांडे, चोहोट्टा- ज्योत्स्ना चोरे.
मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव गटातून भारती सदाफळे, कानडी- गायत्री संगीत कांबे, लाखपुरी- मोहित तिडके, बपोरी- उमेदवार नाही. कुरूम- उमेदवार नाही. माना- सविता रामदास हरणे, सिरसो- उमेदवार नाही.

 

Web Title: Zilla Parishad Elections: Shiv Sena too for the first time independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.