जिल्हा परिषद निवडणूक : चौथ्या दिवशी २०३ उमेदवारांचे २१४ अर्ज दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:29 IST2019-12-22T14:28:57+5:302019-12-22T14:29:01+5:30
जिल्हा परिषदेसाठी ११२ उमेदवारांनी ११९ तर पंचायत समित्यांसाठी ९१ उमेदवारांनी ९५ उमेदवारी अर्ज दाखल केले.

जिल्हा परिषद निवडणूक : चौथ्या दिवशी २०३ उमेदवारांचे २१४ अर्ज दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यात २०३ उमेदवारांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ११२ उमेदवारांनी ११९ तर पंचायत समित्यांसाठी ९१ उमेदवारांनी ९५ उमेदवारी अर्ज दाखल केले.
अकोला जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आणि अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी आॅनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ११२ उमेदवारांनी ११९ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, सातही पंचायत समित्यांसाठी ९१ उमेदवारांनी ९५ उमेदवारी अर्ज दाखल केले.
रविवार, २२ डिसेंबर रोजी शासकीय सुटीचा दिवस वगळता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत आहे.