जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 13:27 IST2019-02-20T13:27:35+5:302019-02-20T13:27:46+5:30

अकोला : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

Zilla Parishad CEO AYUSH Prasad accepted the charge | जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

अकोला : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पगारे यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते. नुकत्याच्या झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये या पदावर आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लार, प्रकल्प संचालक डॉ. श्रीराम कुलकर्णी , मुख्य वित्त लेखाधिकारी मानमोठे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाबाराव पाचपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, कार्यकारी अभियंता किशोर ढवळे , जिल्हा कृषी विकास अधिकारी इंगळे, कार्यकारी अभियंता सोनवणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग, समाजकल्याण अधिकारी चव्हाण, कार्यकारी अभियंता देशमुख यांचेसह पंचायत समिती चे गट विकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. पदभार स्वीकारल्यानंतर आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला.

Web Title: Zilla Parishad CEO AYUSH Prasad accepted the charge