कोरोना संकटाच्या काळात जिल्हा परिषद प्रशासनासोबत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:34+5:302021-04-21T04:19:34+5:30
अकोला: कोरोना संकटाच्या काळात करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषद पूर्ण ताकदीने जिल्हा प्रशासनासोबत उभी राहणार आहे, अशी ग्वाही वंचित बहुजन ...

कोरोना संकटाच्या काळात जिल्हा परिषद प्रशासनासोबत!
अकोला: कोरोना संकटाच्या काळात करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषद पूर्ण ताकदीने जिल्हा प्रशासनासोबत उभी राहणार आहे, अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान दिली.
जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटा आणि रेमडेसिविर इजेक्शनकरिता होणारी परवड लक्षात घेता, यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी चर्चा केली. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता अकोला जिल्हा परिषद पूर्ण ताकदीनिशी जिल्हा प्रशासनासोबत उभी राहणार असल्याची ग्वाही ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राजकुमार चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, अविनाश खंडारे, गजानन दांदळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये
५० खाटांचे उपचार केंद्र सुरु करणार!
कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ५० खाटांचे उपचार केंद्र सुरु करण्याच्या मुद्दयावर ॲड.प्रकाश आंबेडकर व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात निर्णय घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
........................फोटो........................