कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:33+5:302021-07-17T04:15:33+5:30
कशामुळे होतो? झिका व्हायरसचा आजार हा डेंग्यू प्रमाणेच डासांपासून होतो. डास चावल्यानंतर झिका आजाराची लागण होते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे ...

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका!
कशामुळे होतो?
झिका व्हायरसचा आजार हा डेंग्यू प्रमाणेच डासांपासून होतो. डास चावल्यानंतर झिका आजाराची लागण होते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय?
ताप
त्वचेवर लाल रंगाचे डाग
डोकेदुखी
सांधे दुखी
डोळे लाल होणे
उपाययोजना काय?
सध्या झिका व्हायरसवर कोणतीही लस किंवा ठोस उपचार नाहीत. झिका व्हायरस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करताे. अशा परिस्थितीत स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आणि त्यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच त्यावर योग्य उपाय आहे.
डेंग्यूप्रमाणेच झिका व्हायरसदेखील डासांपासूनच पसरतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही डासांची उत्पत्ती होऊ नये, या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घ्यावी.
- डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी