शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:40 IST

५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे

- संतोषकुमार गवईशिर्ला: मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी परिसरात ३०० एकर शेतीवर विजेशिवाय सिंचन करणे शक्य झाले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. हिंमतराव टप्पे आणि अभियंता हरिदास ताठे तथा ५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.अभियंता हरिदास ताठे आणि हिंमतराव टप्पे यांच्या ३६५ दिवसांच्या अथक परिश्रमातून मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावाच्या शेतीपर्यंत धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे पारंपरिक पद्धतीने न आणता थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे ७० टक्के पाण्याची तथा शंभर टक्के विजेची बचत करून शून्याधारित ऊर्जेवर सदर प्रकल्प सुरू आहे. ५१ शेतकºयांच्या वैयक्तिक आर्थिक सहभागातून तथा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीशिवाय सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपये खर्च आला आहे. सध्या या प्रकल्पाचे पाणी मोर्णा धरणापासून थेट कोठारी गावापर्यंत यशस्वीपणे पोहोचले आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक शेतकºयाच्या बांधापर्यंत तुषार संच ठिबक सिंचन अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी पोहोचले जाणार आहे. कोठारी येथे १२० हेक्टरवर संत्रा, मोसंबीच्या बागा आहेत. धरणाच्या पायथ्याशी असूनही गत दोन वर्षांपूर्वी या भागांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या होत्या. शेतीनिष्ठ शेतकरी हिंमतराव टप्पे यांनी सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था स्थापन करून पाटबंधारे विभागाशी करार केला. त्याला कार्यकारी अभियंता वाकोडे, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गजानन अत्तरकार यांनी मोलाची साथ दिली. शून्य ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी अभियंता हरिदास ताठे यांची भेट घेतली आणि मोर्णा धरणातून थेट कोठारी गावापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर पाणी आणण्याचे ठरविले; मात्र यासाठी लागणारा १ कोटीहून अधिक निधी कसा उभा करावा, असा प्रश्न या दोघांसमोर उभा राहिला. बँकांनी नकार दिल्यानंतर ५१ शेतकºयांची बैठक घेतली आणि बहुतांश निधी वैयक्तिक स्तरावर उभा करण्यात आला; मात्र बुलडाणा अर्बन या बँकेने मदत दिल्याने प्रकल्प यशस्वी झाला.

पाण्यासह पैशांची बचतकॅनॉलचे पाणी हे हंगामी पद्धतीने मिळते. यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. दुसरीकडे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने अपव्यय कमी होतो. तसेच जेव्हा हवे असेल तेव्हा पाणी पुरवठा करू शकतो. पाणी वाटपासाठी कर्मचाºयांची गरज नाही, कॅनॉलप्रमाणे दुरुस्ती देखभाल करावी लागत नाही, पाण्याची मागणी करावी लागत नाही, प्रत्येक शेतकºयाची वेगवेगळी गरज लक्षात घेता सोयीनुसार पाणी पुरवठा शक्य झाला आहे. प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था असल्यामुळे सिंचनात कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती