चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर ठाणेदाराने युवकाला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:17+5:302021-03-31T04:19:17+5:30

दहीहंडा पोलीस ठाण्याचे चोहट्टाबाजार येथे अकोट येथील एमएच २७ बीई ४५७४ क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीला ...

A youth was beaten by a police constable in front of Chohatabazar police station | चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर ठाणेदाराने युवकाला चोप

चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर ठाणेदाराने युवकाला चोप

दहीहंडा पोलीस ठाण्याचे चोहट्टाबाजार येथे अकोट येथील एमएच २७ बीई ४५७४ क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीला दुचाकीने धडक दिली. दुचाकीवरील युवक दारूच्या नशेत होते. त्यांनी धक्का मारून उलट मारुती स्विफ्ट डिझायरचे चालक अभिजित घुले याला शिवीगाळ करीत धुमधाम केली. ही माहिती गाडीचे मालक चेतन धनराज भोयर यांना गाडीचालकाने दिली. त्यामुळे भोयर हे स्वतः चोहट्टाबाजार चौकीमध्ये आले असता ‘रिपोर्ट कशासाठी देतो? तुझा रिपोर्ट घेत नाही,’ या कारणावरून वाद घालत, शिवीगाळ करीत ठाणेदार प्रकाश अहिरे व बीट जमादार भटकर यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. या घटनेचे वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस चौकीबाहेर गर्दी झाली होती. यावेळी पोलीस मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ काढून अनेकांनी मोठ्या प्रमाणात ते व्हायरलसुद्धा केले होते.

दुसरीकडे, या घटनेत भोयर यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला धक्का मारून चालकाला शिवीगाळ केल्याच्या चालक अभिजित घुले यांच्या फिर्यादीवरून अकोला येथील सौरभ उत्तम सूरळकर यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची पोलिसांची माहिती आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करून न्याय देण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे चेतन भोयर यांनी केली आहे.

Web Title: A youth was beaten by a police constable in front of Chohatabazar police station