संग्रामपूर तालुक्यातील युवकाचा वांगेश्वर येथे डोहात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:55 IST2018-09-12T17:54:37+5:302018-09-12T17:55:11+5:30

तेल्हारा (जि.अकोला ) : तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ आॅगस्ट रोजी घडली.

The youth of Sangrampur taluka drowned in at Vangeshwar | संग्रामपूर तालुक्यातील युवकाचा वांगेश्वर येथे डोहात बुडून मृत्यू

संग्रामपूर तालुक्यातील युवकाचा वांगेश्वर येथे डोहात बुडून मृत्यू

तेल्हारा (जि.अकोला ) : तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ आॅगस्ट रोजी घडली. आदेश पांडुरंग फोकमारे (२०) असे या युवकाचे नाव आहे.
आदेशचे कुटुंब तेल्हारा तालुक्यातील थार येथील असून, ते गत अनेक वर्षांपासून बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील कोद्री या गावी वास्तव्यास आहेत. त्या गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अस्थी विसर्जनासाठी आदेश वांगेश्वर येथील पूर्णा, गौतमा व विद्रुपा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आला होता. तेथे धार्मिक विधी सुरू असताना आदेश आंघोळीसाठी नदी पात्रात उतरला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याने गटांगळ्या खाल्ल्या व तो डोहात बुडाला. स्थानिक ग्रामस्थांनी बुडालेल्या आदेशला पाण्यातून बाहेर काढले; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

Web Title: The youth of Sangrampur taluka drowned in at Vangeshwar