अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा युवक कारागृहात

By Admin | Updated: March 17, 2017 03:10 IST2017-03-17T03:10:10+5:302017-03-17T03:10:10+5:30

आरोपी शेख शफीक शेख बशीर याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले.

Youth prisoner who exploited a minor girl | अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा युवक कारागृहात

अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा युवक कारागृहात

अकोला, दि. १६- अल्पवयीन मुलीला प्रेमजाळय़ात ओढून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा आरोपी शेख शफीक शेख बशीर याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. डाबकी रोड परिसरातील महाविद्यालयात अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. महाविद्यालय परिसरात शेख शफीक शेख बशीरने मुलीला प्रेमजाळय़ात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तो तिला शहराबाहेर मोटारसायकलवर घेऊन जात असे. दरम्यान, त्याने अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे मुलीला गर्भधारणा झाली; परंतु शेख शफीकने लग्नास नकार दिल्यामुळे मुलीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात ९ मार्च रोजी तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शेख शफीक याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. आरोपीची बाजू अँड. केशव एच. गिरी, अँड. वैशाली गिरी (भारती) यांनी मांडली.

Web Title: Youth prisoner who exploited a minor girl