शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:06 IST

किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे.

ठळक मुद्देपळसोद येथील दोन शेजाऱ्यांचा मंगळवारी दुपारी वाद झाला.डोक्यावर फावड्याने वार करण्यात आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

अकोट/ दहीहांडा : जागेच्या वादातून युवकाची हत्या केल्याची घटना अकोट तालुक्यातील पळसोद येथे २ जून रोजी दुपारी घडली.  किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे.  अकोला जिल्ह्यात हत्यांची मालिका सुरूच असून ९ दिवसांत हा आठवा खून झाला आहे.  दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पळसोद येथील शेजारी राहणाºया पाटेकर कुटुंबांमध्ये जागेवरून वाद सुरू होता. मंगळवारी सागर गणेश पाटेकर व लखन पूर्णाजी पाटेकर यांच्यामध्ये जागेवरून वाद झाला. वाद वाढत असल्याने किसन पूर्णाजी पाटेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सागर गणेश पाटेकर, रवी गणेश पाटेकर, गणेश पूर्णाजी पाटेकर यांनी  किसन पाटेकर व लखन पाटेकर यांना फावड्याने मारहाण केली. यामध्ये दोन्ही भावंडे गंभीर जखमी झाले. दोघांनाही  दहीहांडा पोलिसांनी तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी किसन पाटेकर यास  मृत घोषित केले. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी सागर गणेश पाटेकर, रवी गणेश पाटेकर, गणेश पूर्णाजी पाटेकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हेकॉ दयाराम राठोड, पोकॉ सुभाष वाघ, विजय सावदेकर करीत आहेत.  

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी